सरकतीये जमीन; वाढतीय डोंगरांची उंची, पृथ्वीच्या आत होणारे बदल पाहून वैज्ञानिक झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:31 PM2020-05-13T13:31:15+5:302020-05-13T13:47:50+5:30

वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार, पृथ्वीच्या आत केंद्रातील भाग फिरत आहे. कदाचित याच कारणाने डोंगरांची उंची वाढत असावी, जमीन सरकत असावी आणि चुंबकिय ध्रुव बदलत असावं.

पृथ्वीवर सतत काय बदल होत असतात याबाबत वैज्ञानिक नेहमी रिसर्च करत असतात. असेच वेगवेगळे रिसर्च करत असताना वैज्ञानिकांनी एक अशी नैसर्गीक प्रक्रिया शोधून काढली, ज्याबाबत वाचून कुणीही हैराण होईल.

वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार, पृथ्वीच्या आत केंद्रातील भाग फिरत आहे. कदाचित याच कारणाने डोंगरांची उंची वाढत असावी, जमीन सरकत असावी आणि चुंबकिय ध्रुव बदलत असावं. (Image Credit : Phys.org)

अर्बाना कॅम्पेनमध्ये असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या वैज्ञानिकांनी या भौगोलिक परिवर्तनावर एक रिसर्च केला. हा रिसर्च अर्थ अॅन्ड प्लेनेटरी सायन्स लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. (या लिंकवर संपूर्ण माहिती वाचा - https://phys.org/news/2020-05-mountains-shifting-ground-earth-core.html) (Image Credit : Phys.org)

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या वैज्ञानिकांना मोठ्या अभ्यासानंतर याचे ठोस पुरावे मिळाले की, पृथ्वीचं केंद्र म्हणजे कोर फिरत आहे. ज्यामुळे पृथ्वीचं मॅग्नेटिक फिल्ड म्हणजे चुंबकिय ध्रुवात बदल होतो आहे. याच कारणाने चुंबकिय उत्तर ध्रुव कॅनडापासून वेगळा होऊन सायबेरियाला पोहचला आहे.

पीकिंग युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे सह-लेखक जियाओडोंग सॉन्ग म्हणाले की, 1996 पासून यावर रिसर्च करत आहोत. 1996 मध्ये आम्ही पृथ्वीच्या कोरमध्ये एक छोटा भूकंपीय परिवर्तन पाहिलं होतं. ते हळूहळू फिरत होतं. नंतर त्यावर आम्ही खोलवर अभ्यास केला. (Image Credit : National Geographics)

प्राध्यापक जियाओडोंग म्हणाले की, आम्ही जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर भूकंप येण्याच्या प्रमाणाचा अभ्यास केला. एकाच जागेवरचा आम्ही वेगवेगळ्या वेळेचा डेटा रेकॉर्ड केला. तेव्हा आम्हाला समजून आलं की, भूकंप येण्याचा दर हा पृथ्वीच्या आत फिरत असलेल्या कोरमुळे कमी-जास्त होत आहे. (Image Credit : Phys.org)

प्राध्यापक जियाओडोंग यांनी सांगितले की, कोर फिरत असल्या कारणाने पृथ्वीच्या वरचा सरफेस आणि प्लेट्स आपसात टक्कर खातात किंवा सरकतात. याने पृथ्वीवरील डोंगरांच्या उंचीवरही प्रभाव पडतो.

प्राध्यापक सॉन्ग म्हणाले की, भूकंपामुळे निर्माण होणारे भूकंपिय तरंग पृथ्वीच्या कोरपर्यंत म्हणजेच केंद्रापर्यंत जातात. जर कोर फिरत नसता तर हे तरंग आत पोहोचलेच नसते. नंतर हे तरंग आत जाऊन परत आले असते. (Image Credit : ESA)

भकूंपिय तरंग येण्या-जाण्याच्या मधला वेळ त्यांच्या दरावरून हे माहीत पडतं की, पृथ्वीचं केंद्र फिरत आहे. आम्हाला या तरंगाचा रेकॉर्ड जगभरातील अनेक भूकंप केंद्रातून मिळाला. (Image Credit : AFP)

पृथ्वीच्या आतील गरम लाव्हारसाचं केंद्र जर फिरत नसतं तर आम्हाला हे तरंग परत मिळाले नसते. ते तिथेच थांबले असते. जे तरंग कोरमध्ये जाऊन परत येतात त्यांमध्ये बदल होतो. त्यामुळे पृथ्वीच्या प्लेट्सवर प्रभाव पडतो. (Image Credit : NOAA)