सुसाट पळणाऱ्या ' या ' बाईक्स तुम्हाला माहिती आहेत का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 08:22 PM2018-08-06T20:22:17+5:302018-08-06T20:26:54+5:30

480 कि.मी. : अमेरिकेत डॉड्ज टोमाहॉक नावाची एक बाईक बनवली आहे. ही बाईक तब्बल 480 कि.मी. एका तासात कापू शकते. या बाईकची किंमत आहे 3 कोटी 60 लाख रुपये.

420 कि. मी. : रोल्स रॉईसचे इंजिन लावून अमेरिकेमध्ये एमटीट टर्बाइन सुपरबाईक वायटूके ही बनवण्यात आली आहे. ही बाईक ताशी 420 कि. मी. धावू शकते. या बाईकची किंमत आहे एक कोटी रुपये.

312 कि. मी. : सुझुकी या कंपनीची हायाबुसा ही बाईक ताशी 312 कि. मी. धावू शकते. या बाईकची किंमत आहे 16 लाख रुपये.

310 कि. मी. : होंडा या कंपनीची 1137 सीसी असलेली ब्लॅकबर्ड ही बाईक तासाला 310 कि. मी. एवढे अंतर पाकू शकते. या बाईकची किंमत आहे आठ लाख रुपये. ही बाईल जपानमध्ये बनवली गेली आहे.

310 कि. मी. : एमव्ही ऑगस्टा ही बाईक ताशी 310 किमी वेगाने पळू शकते. या बाईकची किंमत आहे 21 लाख रुपये. इटलीमध्ये ही बाईक बनवण्यात आली आहे.