आजच्याच दिवशी झेपावलं होतं एअर इंडियाचं पहिलं लंडन फ्लाईट; तिकीट किती रुपये होतं माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:27 PM2020-06-08T14:27:28+5:302020-06-08T14:51:17+5:30

आता भलेही लंडनची फ्लाइट एका स्टॉपवर थांबून मोठ्या मुश्किलीने 12 तासात पोहोचते. तेव्हा त्यावेळी ही पहिली फ्लाइट पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले होते.

आज म्हणजेच 8 जून 1948 रोजी एअर इंडियाने त्यांचं पहिलं इंटरनॅशनल उड्डाण लंडनसाठी घेतलं होतं. विमानात 35 प्रवाशी होते. ज्यात जास्तीत जास्त नबाव आणि महाराजा होते. आता भलेही लंडनची फ्लाइट एका स्टॉपवर थांबून मोठ्या मुश्किलीने 12 तासात पोहोचते. तेव्हा त्यावेळी ही पहिली फ्लाइट पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले होते. ही फ्लाइट काहिरा आणि जिनेव्हा द्वारे पोहोचली होती.

हा दिवस भारतीय नागरीक उड्डाणासाठी ऐतिहासिक दिलस होता. एअर इंडिया स्वातंत्र्याआधी टाटा एअरलाइन्स नावाने ओळखली जात होती. स्वातंत्र्यानंतर सरकारने 49 टक्के शेअर घेतले होते. पारसी खबर डॉट नेटने एअर इंडियाच्या पहिल्या उड्डाणावर एक लेख लिहिला आहे त्यातील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात पत्रकार आणि फोटोग्राफर जमले होते. रात्रीची वेळ होती. अंधारातच विमान उड्डाण घेणार होतं. त्यासोबत लिहिला जाणार होता इतिहास. मंगळवारचा दिवस होता. या विमानाचं नाव होतं मालाबार प्रिन्सेस. हे 40 सीट्सचं लाकहीड एल-749 कांस्टेलेशन विमान होतं.

या विमानाचे कॅप्टन होते केआर गुजदार. हे विमान या प्रवासादरम्यान काहिरा आणि जिनेव्हला थांबलं होतं. या विमानात 35 प्रवाशी होते. ज्यातील 29 लंडनला जात होते तर 6 जिनेव्हाला. त्यावेळी एअर इंडियाने काहिरा, लंडन आणि जिनेव्हामध्ये ऑफिस सुरू केलं होतं.

या प्रवासासाठी 03 जून 1948 ला टाइम्स ऑफ इंडियाने दोन कॉलम आणि 15 सेमीची एक जाहिरात प्रकाशित झाली होती. ज्यात महाराजाच्या लोगोसोबत प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं होतं. त्यावर लिहिले होते की, दर मंगळवारी सुंदर कांसटेलेशन विमानावर तुमचं 1720 रूपयात स्वागत आहे.

हे विमान सोनेरी रंगाच होतं. विमानात खाण्या-पिण्याची सगळी व्यवस्था होती. हे विमान अमेरिकेतील लॉकहीड कंपनीने तयार केलं होतं. त्यावेळी एअरहोस्टेस निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होत्या. हा पोशाख एअर इंडियात 1960 पर्यंत होता. नंतर तो साडीत बदलला.

सांताक्रूजच्या छोट्याशा टर्मिनल भवनमध्ये गर्दी होती. तिथे जेआरडी टाटा हेही उपस्थित होते. तेव्हा ते एअर इंडियाचे चेअरमन होते. तसेच महाराजा दलीप सिंह जे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच बघायला लंडनला जात होते. तसेच विमानात अनेक वरिष्ठ अधिकारी, इंग्रज आणि उद्योगपती होते.

टाटा हे स्वत: या विमानाने प्रवास करत होते. तिथे पोहोचल्यावर मेनन आणि टाटा भेटले तर दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. याच आनंदात एक मोठी पार्टी झाली होती.

मालाबार प्रिन्सेस हे विमान 10 जून रोज सकाळी लंडनला पोहोचलं. या दरम्यान विमान 24 तास हवेत होतं. आता तर हा प्रवास 10 तासात पूर्ण होतो. विमानाने लंडनमध्ये स्मूथ लॅंडिंग केलं. तिथे प्रवाशांच्या स्वागतासाठी भारतीय वरिष्ठ अधिकारी हजर होते.

टाटा हे स्वत: या विमानाने प्रवास करत होते. तिथे पोहोचल्यावर मेनन आणि टाटा भेटले तर दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. याच आनंदात एक मोठी पार्टी झाली होती.