हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:09 PM2021-06-17T17:09:14+5:302021-06-17T17:19:00+5:30

एक कपल लग्नानंतर हनीमूनसाठी गेलं होतं तेव्हा महिलेला समजलं की, तिला एक पुरूष नसून ट्रान्सजेंडर आहे. यानंतर महिलेने जे केलं ते सर्वांना हैराण करणारं होतं. ही घटना ब्रिटनमधील आहे.

दोन व्यक्ती जेव्हा लग्न करतात तेव्हा एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांशी बोलून लग्न करतात. मात्र, एका महिलेसोबत असं झालं ज्याची तिने कल्पनाही केली नसेल आणि त्यानंतर जे झालं त्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल.

एक कपल लग्नानंतर हनीमूनसाठी गेलं होतं तेव्हा महिलेला समजलं की, तिला एक पुरूष नसून ट्रान्सजेंडर आहे. यानंतर महिलेने जे केलं ते सर्वांना हैराण करणारं होतं. ही घटना ब्रिटनमधील आहे.

मिरर डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या एका ग्राफिक डिझायनरने अमेरिकेतील एक तरूणीसोबत २०१८ मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. जेव्हा कपल हनीमूनला गेलं तर तरूणीला समजलं की, तिचा पती एक ट्रान्सजेंडर आहे. त्यानंतर जे झालं त्याची जगभरात चर्चा सुरू आहे.

रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय जेक आणि ३० वर्षीय जे हार्वीची पहिली भेट २००७ मध्ये एका वेबसाइट ऑनलाइन माध्यमातून झाली होती. त्यांच्या मैत्रीचं २०१० मध्ये प्रेमात रुपांतर झालं. काही वर्षानी दोघांनी लग्न करण्याचा प्लॅन केला. त्यांनी २०१८ मध्ये लग्न केलं.

लग्नाच्या दोन महिन्यांनी हनीमूनला गेल्यावर जेकने पत्नी हार्वीला त्याच्याबाबत खरं सांगितलं. त्याने सांगितलं की, त्याला नेहमीच एक ट्रान्सजेंडर व्हायचं होतं. त्यानंतर हार्वीने आनंदाने जे केलं ते उदाहरण बनलं आहे. हार्वीने पती जेकला महिला बनण्यासाठी मदत केली.

रिपोर्टमद्ये याचा उल्लेख केला आहे की, कशाप्रकारे हार्वीने साधारण ४५००० पाउंड खर्च करून जेकची सर्जरी केली. तिनेच अनेकदा त्यांचं मेकअप केलं. मग हळूहळू जेकला महिला बनवलं. नंतर जेकने नाव बदलून रायना असं केलं.

जेक म्हणजेच रायना आणि हार्वी आता पुन्हा एकदा लग्नाचं प्लॅनिंक करत आहेत. आनंदाची बाब ही आहे की, सोशल मीडियावर लोकांचं दोघांनाही समर्थन मिळत आहे.

जेक म्हणाला की, त्याला त्याच्या पार्टनरवर गर्व आहे आणि ते सप्टेंबर महिन्यात क्वांटॉक्समध्ये पुन्हा लग्न लग्न करणार आहेत. त्यांनी हेही सांगितलं की, जेव्हा आम्ही लग्न करू तेव्हा आमचा परिवार आमच्या सोबत असेल आणि ते आमचं स्वागत करतील.