बोंबला! 'इथे' लग्नात जावयाला हुंडा म्हणून दिले जातात 21 विषारी साप, त्याशिवाय होतंच नाही लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:24 PM2020-06-17T16:24:50+5:302020-06-17T16:59:05+5:30

नवरदेवाला लग्नात चक्क विषारी साप देण्याची प्रथा मध्य प्रदेशातील एका विशेष समाजात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा आजही इथे पाळली जाते. चला या अनोख्या प्रथेबाबत जाणून घेऊ...

मुलीच्या लग्नात साधारणपणे प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वखूशीने पैशांपासून ते गाडीपर्यंत भेट जावयाला देतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, एखाद्या नवरदेवाला विषारी साप भेट दिले असतील. नाही ना? पण असा रिवाज भारतातील एका भागात आहे.

नवरदेवाला लग्नात चक्क विषारी साप देण्याची प्रथा मध्य प्रदेशातील एका विशेष समाजात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा आजही इथे पाळली जाते. चला या अनोख्या प्रथेबाबत जाणून घेऊ...

मध्य प्रदेशातील गौरिया समुदायातील लोक आपल्या जावयाला हुंड्यात तब्बल 21 विषारी साप देतात. या समुदायात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

अशी मान्यता आहे की, जर या सुमदायातील एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या मुलीच्या लग्नात जावयाला साप दिले नाही तर, त्याच्या मुलीचं लग्न लवकर तुटतं.

असे सांगितले जाते की, मुलीचं लग्न जुळताच वडील जावयाला भेट देण्यासाठी साप पकडणे सुरू करतो. यात अनेक विषारी साप असतात.

आश्चर्याची बाब म्हणजे या समुदायातील लहान मुले बालपणापासूनच सापांसोबत खेळतात. त्यांना जराही भीती वाटत नाही.

या समुदायातील लोकांना मुख्य व्यवसाय ह साप पकडने हाच आहे आणि ते लोकांना साप दाखवून पैसे कमावतात.

हेच कारण आहे की, वडील जावयाला हुंड्यात साप देतो. जेणेकरून जावई सापांच्या माध्यमातून पैसे कमावू शकेल आणि परिवाराचं पोट भरू शकेल.