रहस्य! असा डोंगर जो सकाळपासून सायंकाळपर्यंत सरड्यासारखा रंग बदलतो, बघा अद्भुत फोटो!

Published: May 10, 2021 05:28 PM2021-05-10T17:28:59+5:302021-05-10T17:35:45+5:30

हा डोंगर ऑस्ट्रेलियातील उत्तरेत आहे. ही एक यूनीसेफची हेरिटेज साइटही आहे. या डोंगराला उलुरू किंवा आर्यस रॉक म्हणलं जातं.

सरडा रंग बदलतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण एखादा डोंगर बदलतो असं सांगितलं तर सर्वांनाच प्रश्न पडेल. हे जरा विचित्र आहे पण खरं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक असा डोंगर आहे जो सकाळपासून सायंकाळपर्यंत असाच रंग बदलतो. हा डोंगर रोज रंग बदलतो. प्रत्येक वातावरणात त्याचं असंच सुरू राहतं.

हा डोंगर ऑस्ट्रेलियातील उत्तरेत आहे. ही एक यूनीसेफची हेरिटेज साइटही आहे. या डोंगराला उलुरू किंवा आर्यस रॉक म्हणलं जातं. या डोंगराबाबत १५० वर्षाआधी माहिती मिळाली होती. १८७३ मध्ये हा डोंगर एका इंग्रजाने शोधला होता. त्या काळात हेन्री आर्यस हे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांच नाव या डोंगराला देण्यात आलं.

हा अंडाकार डोंगर ३३६ मीटर उंच आहे आणि याचा गोलाकार ०७ किलोमीटर आहे. तर रूंदी २.४ किलोमीटर आहे. सामान्यपणे या डोंगराचा रंग लाल आहे. मात्र, सकाळी सूर्य उगवताच याचा रंग बदलायला सुरूवात होते. सायंकाळी तर पूर्ण रंग बदलतो. सकाळी यावर सूर्यकिरणे पडतात तर असं वाटतं डोंगरावर आग लागली आहे.

तर सायंकाळी या डोंगराचा वेगळाच रंग बघायला मिळतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत याचा रंग कधी पिवळा, कधी नारंदी तर कधी लाल होतो. तर कधी हा जांभळाही होतो.

हा काही चमत्कार नाही. याचं कारण एक खास संरचना आहे. याच्या दगडाची संरचान विशेष आहे. हा डोंगर बलुआ दगड म्हणजे सॅंडस्टोनपासून बनला आहे. ज्याला कांग्लोमेरेट म्हटलं जातं.

रंगात होत असलेल्या बदलामुळे येथील स्थानिक लोक या डोंगराला देव मानत होते. येथील गुहांची ते पूजा करत होते. आता तर या डोंगरापर्यंत जाण्यासाठी रस्ते बनले आहेत. हजारो पर्यटक इथे भेट देतात.