लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का? पाहा झक्कास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 05:21 PM2020-12-02T17:21:33+5:302020-12-02T18:10:30+5:30

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात गेल्या १० ते ११ महिन्यांपासून कहर केला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी येणार याची प्रतिक्षा संपूर्ण जगभरातील लोकांना आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस सगळ्यात मोठी लस निर्मिती कंपनी असून या कंपनीकडून संपूर्ण जगाला खूप अपेक्षा आहेत.

यानिमित्ताने सिरमसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा कार्यभार सांभाळणाऱ्या आदर पुनावाला यांच्याविषयीची जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सूक आहेत.

आदर पुनावाला यांच्या घराबद्दल तसंच त्यांच्या कुटूंबाबद्दल काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आदर पुनावाला हे डॉ. सायरस पुनावाला यांचे पूत्र आहेत. १९६६ साली डॉ. सायरस यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली होती. पुनावाला यांनी मुंबईमधील Lincole House खरेदी केले आहे.

हे घर ७५० कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटलं जात आहे. ही संपत्ती भारतामधील सर्वात महागड्या वास्तूंपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

आदर पुनावाला यांची पत्नी नताशा पुनावाला यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या घराचे तसंच कुटूंबासह वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत.

२००६ मध्ये आदर पुनावाला आणि नाताशा यांनी लग्न केले.

आदर पुनावाला यांचा पुण्यात २२ एकरमध्ये फार्महाऊस आहे.

मुंबई आणि पुण्यातील दोन्ही घरं आकर्षक आहेत.

नाताशा आणि आदर पुनावाला यांनी कुटूंबियांसोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वेगवेगळ्या सण उत्सवांच्या निमित्ताने नताशा यांनी आकर्षक ड्रेसअपमधील फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

(Image credit-Rauter, natasha.poonawalla, instagram)

Read in English