बाबो! ४८ वर्षांच्या माणसानं १३ वर्षीय मुलीशी केलं लग्न; आतापर्यंत आहेत ४ बायका, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 06:28 PM2020-11-17T18:28:17+5:302020-11-17T18:34:07+5:30

फिलीपीन्समधून एका धक्कादायक घटना समोर येत आहे. एका ४८ वर्षाच्या माणसाने १३ वर्षाच्या मुलीसह लग्न केलं आहे. या नवरदेवाचे नाव अब्दुल रज्जाक आहे. फिलीपीन्सच्या मामासॅपानो शहरात झालेल्या लग्नात मोठ्या संख्येने पाहूणे उपस्थित होते.

अब्दूलने सांगितले की, त्याला १३ वर्षांच्या मुलीशी लग्न करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. या लग्नानंतर मी खूप खूश आहे. आता आपल्या नव्या पत्नीसह मिळून मला माझ्या मुलांचा सांभाळ करायचा आहे.

जेव्हा ही मुलगी २० वर्षांची होईल तेव्हा मुलं जन्माला घालण्याचा प्लॅन करत आहेत. आता अब्दूलने ज्या मुलीशी लग्न केलंय तिला शाळेत पाठवणार आहेत. पण घरी आल्यानंतर तिला मुलांचा सांभाळ करावा लागेल.

फिलीपीन्सच्या काही क्षेत्रांमध्ये विशेषतः मुस्लिम बहुल क्षेत्रात कमी वयातील मुलांनाही लग्नसाठी परवानगी दिली जाते. यूनाइटेड नेशन्स चिल्ड्रन फंड डाटानूसार बालविवाहाच्या बाबतीत हा देश १३ व्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी बाल विवाहितांची संख्या ७ लाख २६ हजार आहे.

लंडनच्या कँपेन ग्रुप गर्ल्स नॉट ब्राइड्सच्या मते वाल विवाह मुलांचे आरोग्य आणि शिक्षणाच्या अधिकारांचे हनन करत आहे. या संस्थेने बालविवाह मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे. लहान मुलं मानसिकदृष्या लग्नासाठी तयार नसतात. महिला आणि मानवतेच्या चांगल्या भविष्यासाठी ही पद्धत पूर्णपणे बंद व्हायला हवी.

Read in English