१० लग्झरी गाड्या, आलिशान बंगला अन् बरचं काही...; १३३२ कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेचं आयुष्यच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 10:48 PM2021-04-29T22:48:35+5:302021-04-29T22:53:39+5:30

लॉटरी असा खेळ आहे जो एका झटक्यात जमिनीपासून एखाद्या आकाशाच्या उंचीवर नेऊ शकतो. ब्रिटनमध्ये राहणारी गिलियन बेफोर्डसोबत असंच काहीसं घडलं. गिलियन बेफोर्ड आज एकदम बिनधास्त जीवन जगत आहे. त्यांच्याकडे आलिशान बंगला, १० लग्झरी गाड्या आणि स्वत:चा बिझनेस आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, लॉटरी विजेता गिलियन बेफोर्डने अलीकडेच त्यांच्या आयुष्याबद्दल शेअर केले. दहा लग्झरी गाड्या, आलिशान बंगला यासह अनेक कंपन्याची मालकीन असलेल्या गिलियन बेफोर्ड वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा एकदा आई होणार आहे.

खरं तर, गिलियन बेफोर्डने २०१२ मध्ये लॉटरीच्या तिकिटातून १ हजार ३३२ कोटी रुपये जिंकून ऐतिहासिक विक्रम केला होता. तथापि, ज्या पार्टनरसोबत त्यांनी ही लॉटरी जिंकली होती. त्याला १५ महिन्यांनी घटस्फोट देऊन त्यांनी प्रियकरासोबत लग्न केले.

गिलियन बेफोर्ड यांचे पतीही कार प्रेमी आहेत. घटस्फोटानंतर चोरीचा आरोप असलेल्या एका व्यक्तीशी गिलियन बेफोर्डने लग्न केले. गिलियनचे पती ब्रायन हे प्रॉपर्टी नूतनीकरणासाठी काम करतात

सध्या गिलियन बेफोर्ड त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटत आहे. त्यांनी विकत घेतलेल्या घरात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. गिलियन सध्या तिच्या नवीन बाळाबरोबर खूप मजा घेत आहे. ती फक्त त्यांच्याबरोबरच दिसली आहे. त्याआधीही ती दोनदा आई झाली आहे

गिलियनच्या नवऱ्याबद्दल बोलाल तर तर तो प्रॉपर्टी नूतनीकरणासाठी काम करतो. गिलियन बेफोर्डने २०१२ मध्ये लॉटरी जिंकल्यानंतर सुमारे १५ महिन्यांनी ब्रायनशी लग्न केले. त्यावेळी ब्रायनने सांगितले होते की, त्याने आपल्या पत्नीस डेटिंग करण्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्या गुन्ह्याबद्दल सत्य सांगितले होते.

वास्तविक, काही काळापूर्वी ब्रायनवर चोरीचा आरोप होता. मीडिया रिपोर्टमध्ये, गिलियनचा नवरा ब्रायन डीनला चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले होते आणि त्याला १२ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

लॉटरी गेम यूकेमध्ये खूप प्रसिद्ध आहे. लॉटरी खेळ केवळ यूकेमध्येच नव्हे तर संयुक्त अरब अमिरातीमध्येही खेळले जातात. भारतीयांनीदेखील यूएईमध्ये लॉटरी जिंकली अलीकडे अशी अनेक नावं उघडकीस आली आहेत.

अलीकडेच, दुबईमध्ये सुमारे दोन आठवड्यांपूर्वी असेच एक प्रकरण समोर आले होते, ज्यात एकसाथ ६ भारतीयांची नशीब उजळलं. या सर्वांना संयुक्तपणे दहा लाख दिरहम (सुमारे दोन कोटी रुपये) ची लॉटरी लागली. सर्व सहा स्पर्धकांनी सहा पैकी पाच गुण जुळवून द्वितीय पारितोषिक जिंकले.

यातील पाच विजयी केरळचे आहेत, तर एक केरळ वंशाचा आहे. प्रथमच ड्रॉमध्ये भाग घेणारा युएईचा ६९ वर्षीय रहिवासी रॉबर्ट म्हणाला की, माझे काही सहकारी लॉटरी खेळत आहेत, म्हणून मी त्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला.

रॉबर्ट मूळचा केरळचा असून तो ४० वर्षांहून अधिक काळ युएईमध्ये राहत आहे. रॉबर्टने सांगितले की, मी आयसोलेशनमध्ये होतो. त्यावेळी माझ्या एका मित्राने फोन केला आणि या लकी ड्रॉच्या विजयाबद्दल माहिती दिली.

या सर्व विजेत्यांनी आपल्या कुटुंबासाठी ही रक्कम खर्च करणार असल्याचे सांगितले होते. काहींनी आपल्या मुलीला देण्याचे सांगितले होते, तर काहींनी आपले पैसे भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीही अनेक भारतीयांनी दुबईत पैसे जिंकले आहेत.