ध्वजारोहण, शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:41 PM2019-05-01T14:41:12+5:302019-05-01T14:49:44+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला.

पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गयाज उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.

पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

अधिकाऱ्यांकडून शानदार संचलन करण्यात आले असून, त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड पुरुष व महिला पथक सहभाग घेतला.

शहर वाहतूक शाखा, बॉम्बशोधक पथक, पोलीस बॅण्ड पथक, वरुण पथक, जळगाव शहर महापालिकेचे अग्निशमन पथक, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताच्या मुलांनीही कवायतीचे वेगवेगळे प्रकार करून दाखवले.