ही आहे जगातील अवाढव्य लायब्ररी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:55 PM2017-11-16T20:55:25+5:302017-11-16T20:58:02+5:30

चीनमधील टियांजिन बिनहाई येथे गेल्या महिन्यात एका अवाढव्य लायब्ररीचे उद्धाटन करण्यात आले.

जवळपास 37000 स्वेअर फूट आणि पाच मजली इमारत असलेल्या या लायब्ररीला 'टियांजिन बिनहाई लायब्ररी' असे नाव देण्यात आले आहे.

'टियांजिन बिनहाई लायब्ररी' असे या लायब्ररीचे नाव असले, तर या लायब्ररीला 'आय ऑफ बिनहाई' या नावाने सुद्धा ओळखले जाते.

या लायब्ररीचे डिझाईन डच कंपनी एमवीआरडीवीने केले आहे. एखाद्या डोळ्याप्रमाणे अशी ही युनिक डिझाईन केली आहे.

याचबरोबर, या लायब्ररीमध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये बुक स्टोरेज, संगणक रुम, ऑडिओ रुम, मिटिंग रुम आणि रिडिंग स्पेस देण्यात आला आहे.