घटस्फोटानंतर 'त्या' महिलेने असं काय केलं?, सोशल मिडीयात झाले फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 02:43 PM2019-04-03T14:43:59+5:302019-04-03T14:52:37+5:30

लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये वादविवाद झाल्यानंतर घटस्फोट घेतला जातो. घटस्फोट झाल्यानंतर अनेक जणांना दुख: होतं मात्र काही लोक नात्याच्या बंधनातून मुक्तता झाल्यामुळे आनंदी होतात.

47 वर्षीय महिलेचा नवऱ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आनंद गगनात मावेना अशी परिस्थिती झाली. 13 वर्षानंतर ती लग्नाच्या बंधनातून मुक्त झाली. त्यानंतर तिने आनंद असा साजरा केला की तिचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले

सोशल मिडीयातही अनेकांनी त्या महिलेचे कौतुक केलं, त्या महिलेकडून घटस्फोटीत महिलांना प्रेरणा घ्यावी असाही सूर नेटीझन्सकडून उमटला. ज्या लोकांची लग्न झाली आहेत मात्र वैवाहिक जीवनात ते आनंदी नाहीत अशांसाठी हा धडा आहे असं सांगितलं गेलं.

मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार मैरी तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली होती. तिचा नवरा व्यसनाधीन झाला होता. त्याचा जास्तीत जास्त वेळ जेलमध्येच जात असे. लग्नानंतर तिला नरकयातना सहन कराव्या लागत होत्या.

सोशल मिडीयात या महिलेने जे फोटो अपलोड केले त्यात हातात वाईनचा ग्लास पकडत तिच्या लग्नाचे फोटो जाळत असल्याचं चित्र दिसलं. या महिलेचं नावं मैरी लॉलिस असं आहे.

या नरकयातनेतून बाहेर पडून नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी मैरी लॉलिसने तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली.

घटस्फोट झाल्यानंतर नवीन जीवनाची सुरुवात तिने जल्लोष करत केली. ट्विटर आणि फेसबुकवर तिने केलेल्या जल्लोषाचे फोटो व्हायरल झाले. मात्र तिचा हा अंदाज सोशल मिडीयातील अनेक नेटीझन्सना पसंत पडला.

मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार मैरी तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली होती. तिचा नवरा व्यसनाधीन झाला होता. त्याचा जास्तीत जास्त वेळ जेलमध्येच जात असे. लग्नानंतर तिला नरकयातना सहन कराव्या लागत होत्या.