...जेव्हा रात्री 3 वाजता पाकच्या पंतप्रधानांना हल्ल्याचा फोन येतो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 07:12 PM2019-04-10T19:12:50+5:302019-04-10T19:18:23+5:30

26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत बालकोट भागातील दहशतवादी तळांना टार्गेट केलं. त्या बातमी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची झोप उडाली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना रात्री 3 वाजता समजलं.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांना रात्री 3 वाजता कॉल आला. पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्याने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत येऊन एअर स्ट्राईक केल्याची फोनवरुन माहिती दिली

बालकोट भागात भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. आणि भारतीय सीमेलगत एका निर्जन स्थळी बॉम्ब फेकले गेले अशी माहिती इमरान खानने दिली.

भारताने आमच्या झाडांवर हल्ला केला म्हणून आम्ही त्यांच्या दगडावर हल्ला करण्याचा विचार केला असंही इमरान खानने सांगितले. भारताच्या पंतप्रधानांनी एअर स्ट्राईक करुन भारतीय जनतेला आकर्षित करण्याचा मार्ग अवलंबला.

भारत हिंदू राष्ट्र म्हणून पुढे येतोय त्याची चिंता आहे. भारतातील मुस्लिमांविरोधात अन्याय वाढत चालला आहे. भारतात आता जे काही चालले आहे. त्याची कल्पनाही करु शकत नाही असा आरोप इमरान खान यांनी केला.

पायलय अभिनंदनला पुन्हा भारताच्या हवाली करुन आम्ही भारत आणि पाकमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला असा दावा इमरान खान यांनी केला.

मोदी सरकार काश्मीर विवाद सोडविण्यासाठी चांगला पर्याय असू शकतात. कारण त्यांना दक्षिणपंथी हिंदू लोकांचे समर्थनदेखील आहे. आमच्याकडे शांतता राखण्यासाठी संधी आहे. फक्त या निवडणुका होऊ द्या असं इमरान खान यांनी सांगितले.