कोरोनाची दोन 'खास' औषधं, यांच्यामुळे वेगानं रिकव्हर होतायत डोनाल्ड ट्रम्प!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 5, 2020 09:34 PM2020-10-05T21:34:23+5:302020-10-05T21:42:08+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील उपचारासाठी कोरोनावरील दोन औषधांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही औषधांचा सध्या प्रयोग सुरू आहे.

डॉक्टर ट्रम्प यांना Remdesivir आणि REGN-COV2 ही औषधं देत आहेत. ट्रम्प म्हणाले, त्यांना रुग्णालयातील उपचारांनंतर आता पूर्वीच्या तुलनेत बरे वाटत आहे. जाणून घेऊया ही दोन औषधं कोरोनावरील उपचारांत कशापद्धतीने काम करतात.

सर्वप्रथम जाणून घेऊया, REGN-COV2 संदर्भात. हे औषध अमेरिकन कंपनी Regeneronने तयार केले आहे. अद्याप हे औषध सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही. इंग्लंडमध्येही याचे परीक्षण सुरू आहे.

REGN-COV2ला अँटीबॉडी कॉकटेल असेही म्हटले जात आहे. हे औषध उंदीर आणि कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या अँटीबॉडीज यांचे मिश्रण करून तयार करण्यात आले आहे.

REGN-COV2 या औषधासंदर्भात सध्या मोजक्या स्वरुपातच माहिती उपलब्ध आहे. मात्र, असे सांगण्यात येते, की हे औषध काही प्रमाणात कोरोनाचा फैलाव रोखते.

ट्रम्प यांना दिले जाणारे दुसरे औषध रेमडेसिव्हिर. आतापर्यंतच्या ट्रायलमध्ये हे औषध कोरोनापासून एखाद्याचा जीव वाचविण्यात यशस्वी ठरल्याचे दिसून आलेले नाही. मात्र, या औषधामुळे रुग्ण लवकर रिकव्ह अथवा बरा होताना दिसतो.

रेमडेसिव्हिर हे औषध इबोलावरील उपचारासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, ते कोरोनावरील उपचारांतही प्रभावी ठरत आहे.

युरोप आणि अमेरिकेसह काही इतर देशांत रेमडेसिव्हिर औषधाच्या इमरजन्सी वापराला परवानगी देण्यात आलेली आहे.

अमेरिकेत सध्या केवळ गंभीर रुग्णांवरील उपचारांसाठीच रेमडेसिव्हिर औषध वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.