'या' मुस्लिम राष्ट्रांनी आतापर्यंत केलाय पंतप्रधान मोदींचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:10 PM2019-08-26T23:10:08+5:302019-08-26T23:13:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदींना बहरीनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त अरब अमिराती(United Arab Emirates) या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ मिळाला आहे.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मालदीवच्या दौऱ्यावर गेले आहेत. मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवच्या 'निशान इज्जुद्दीन' या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी नरेंद्र मोदींना हा सन्मान बहाल केला.

ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन' या सन्मानाने गौरविण्यात आलं होतं. भारत आणि पॅलेस्टाइनमधले संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे योगदान दिलेय, त्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मान “आमिर अमानुल्लाह खान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेरातमधील ऐतिहासिक अफगाण-भारत मैत्री धरणाचे उद्‌घाटन केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घानी यांनी मोदींना हा सन्मान प्रदान केला आहे.