या आहेत सौदीच्या राजपुत्राकडील आलिशान कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 02:31 PM2019-02-22T14:31:23+5:302019-02-22T14:42:41+5:30

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान नुकतेच भारतभेटीवर आले होते. ऐशोआरामात राहणाऱ्या आतामधील शेखांसारखेच सौदीच्या राजपुत्रांचेही जीवन शाही असून, त्यांच्याकडे अनेक आलिशान कारचा ताफा आहे.

बुगाटी - बुगाटी ही सौदीच्या राजपुत्राकडे असलेली सर्वात महागडी कार आहे. याची किंमत सुमारे 21 कोटी रुपये इतकी आहे.

रोल्स रॉयल्स - सौदीच्या राजपुत्राकडे रोल्स रॉयल्स गाड्यांचाही ताफा आहे. या गाडीची किंमत ही 11 कोटी एवढी आहे.

लेम्बोर्गिनी - सुमारे पाच कोटी रुपये किंमत असलेली लेम्बोर्गिनी कारही सौदीच्या राजपुत्राच्या ताफ्यात आहे.

फेरारी - सौदीच्या राजपुत्राकडे असलेल्या महागड्या कारच्या ताफ्यात पाच कोटी रुपये किमतीच्या फेरारी कारचाही समावेश आहे.

बेंटले - सौदीच्या राजपुत्राकडे सुमारे सहा कोटी रुपये किंमत असलेली बेेंटले कारही आहे.