थायलंडच्या राजाने केले बॉडीगार्डशीच लग्न, पाहा लग्नसोहळ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 08:45 PM2019-05-02T20:45:23+5:302019-05-02T20:50:12+5:30

थायलॅंडचे राजे वजिरालॉन्कोर्न यांनी आपल्या बॉडीगार्डशी विवाह केला आहे. त्यांनी त्यांच्या पर्सनल बॉडीगार्ड फोर्सच्या डेप्युटी हेड सुथिदासोबत लग्न केले.

राजघराणे आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने थायलंडचे राजे वजिरालॉन्कोर्न यांनी एक ऐतिहासिक काम केले आहे.

राजा वजिरालॉन्कोर्न यांनी सुथिदा तिजाई यांना राणीचा दर्जा दिला आणि आता त्या राज परिवारासोबत राहतील.

या विवाहाबाबत काहीच चर्चा झाली नव्हती. बुधवारी अचानक या लग्नाची घोषणा करण्यात आली. थायलंडच्या वृत्तवाहिन्यांवर आधी लग्नाच्या घोषणेची माहिती दिली गेली आणि काही वेळाने राजा - राणीच्या लग्नाचा व्हिडीओ सुद्धा दाखवण्यात आला.

राजा वजिरालॉन्कोर्न ६६ वर्षाचे आहेत. २०१७ मध्ये त्यांचे वडील राजा अतुल्यतेज भूमिबोल यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांना राजा घोषित करण्यात आलं.

राजा वजिरालॉन्कोर्न यांची याआधीही तीन लग्ने झाली आहेत. तसेच त्यांना या तीन पत्नींपासून ७ अपत्ये आहेत. राजा वजिरालॉन्कोर्न आणि सुथिदा यांचा विवाह आधी पारंपरिक पद्धतीने आणि नंतर रजिस्टर करण्यात आला.