आश्चर्यच! या देशांमध्ये नाही एकही गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 08:47 PM2019-06-10T20:47:54+5:302019-06-11T14:37:48+5:30

गाव-खेडी, छोटीमोठी शहरे मिळून देश बनतो. साधेपणा जपणाऱ्या गावांशिवाय देशाला पूर्णत्व येऊ शकत नाही. मात्र या जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जिथे एकही गाव नाही. जाणून घेऊया अशा देशांविषयी.

केवळ 37 हजार 308 लोकसंख्या असलेल्या मोनॅको या शहरवजा देशात एकही खेडेगाव नाही.

नाऊरू या छोट्याशा बेटावर वसलेल्या देशात एकही गाव नाही. या देशाची लोकसंख्या केवळ 10 हजार 084 एवढी आहे.

श्रीमंती आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंगापूरविषयी तुम्ही ऐकलंच असेल. संपूर्ण शहरीकरण झालेल्या सिंगापूरमध्येही एकही गाव नाही. सिंगापूरची लोकसंख्या 56 लाख 07 हजार 003 एवढी आहे.

ख्रिस्ती धर्मियांचे पवित्र ठिकाणी आणि पोपचे निवासस्थान असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही गाव नाही. या देशाची लोकसंख्या केवळ १ हजार एवढीच आहे.

अंगुइला या देशात एकही गाव आढळत नाही. येथील लोकसंख्या केवळ 14,764 एवढी आहे.

अनेक बेटांचा मिळून बनलेल्या बर्मुडामध्येही गावांचे अस्तित्व नाही. येथील लोकसंख्या केवळ 63,779 एवढीच आहे.

60 हजार 765 लोकसंख्या असलेल्या कायमान आयलँड्समध्येही गाव नाहीत.

जिब्राल्टर हासुद्धा मर्यादित विस्तार असलेला आणि पूर्ण शहरीकरण असलेला देश आहे. त्याची लोकसंख्या 32,194 एवढी आहे.

हाँगकाँग हा देशसुद्धा तेथील सुबत्तेसाठी प्रसिद्ध आहे. या देशात एकही गाव नाही. येथील लोकसंख्या 74 लाख 09 हजार 800

मकाओ या देशामध्येसुद्धा एकही गाव नाही. येथील लोकसंख्या 6 लाख 50 हजार 900 एवढी आहे.

33 हजार 609 लोकसंख्या असलेल्या सिंट मार्टेन या देशातही एकही गाव नाही.