नॉर्थ कोरियात उडणारे हजारो फुगे बघून किम जोंग परिवाराचे धाबे का दणाणले? बहिणीने दिली थेट धमकी....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 02:13 PM2020-06-07T14:13:54+5:302020-06-07T14:31:20+5:30

किम जोंगने याआधीही या फुग्यांवरून शेजारी देशाला इशारा दिला आहे. आता त्याच्या बहिणीने सुद्धा धमकी दिली आहे की, फुग्यांव्दारे केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे परिणाम वाईट होतील.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याच्या बहिणीने दक्षिण कोरियाला फुग्यांबाबत इशारा दिला होता. दक्षिण कोरियातून उत्तर कोरियाच्या सीमेवर मोठ मोठे फुगे सोडले जातात. ज्यांवर अॅंटी किम संदेश लिहिलेले असतात. हे फुगे नॉर्थ कोरियातून पळालेले लोक किंवा दक्षिण कोरियातील सामाजिक कार्यकर्ते लिहितात. जे किम जोंगच्या दडपशाहीला कंटाळले आहे.

किम जोंगने याआधीही या फुग्यांवरून शेजारी देशाला इशारा दिला आहे. आता त्याच्या बहिणीने सुद्धा धमकी दिली आहे की, फुग्यांव्दारे केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे परिणाम वाईट होतील.

नॉर्थ कोरियातील किम परिवारावर काहीही बिनधास्तपणे बोललं जात नाही. असं केल्यास त्या व्यक्तीला देशद्रोही ठरवत लागोपाठ तीन पिढ्यांना शिक्षा दिली जाते. त्यानंतर वेदना देणं संपत नाही. नॉर्थ कोरियातून पळालेले लोक नेहमीच तेथील सत्तेबाबत इंटरनॅशनल मीडियात बोलत असतात.

पळून गेलेले लोक जास्तीत जास्त दक्षिण कोरियात वसले आहेत. तिथे स्वातंत्र्य आहे. असे मानले जाते की, असे 45 हजार लोक दक्षिण कोरिया राहतात. हेच लोक फुग्यांवर संदेश लिहून उत्तर कोरियाला पाठवतात.

12 मीटर लांब या पारदर्शी फुग्यांमध्ये हीलियम किंवा हायड्रोजन भरलेलं असतं जेणेकरून ते दूरपर्यंत जावे. यांच्या आत लीफलेट्स, वृत्तपत्रांची कात्रणे, जगाची माहिती असते. त्यासोबतच पेन-ड्राइव्ह असतात. ज्यांमध्ये 40 ते 50 तास वाचली जाऊ शकेल इतकी माहिती असते.

यांमध्ये किम जोंगच्या अत्याचारांच्या माहितीशिवाय जगभरातील गोष्टींची माहिती असते. नॉर्थ कोरियातील लोकांकडे बाहेरील जगाशी जुळण्याचं कोणतंही साधन नाही. इंटरनेटवरही तिथे काही ठराविकच माहिती मिळते. तर न्यूज चॅनल्सवरही सरकारचा कब्जा आहे. अशात बाहेर गेलेले लोक या आंदोलनातून त्यांच्या देशातील लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतात.

दक्षिण कोरियात एक मानवाधिकार संस्था हे आंदोलन आयोजित करते. असे मानले जाते की, याला दक्षिण कोरियासोबत अमेरिकेचीही गुप्तपणे मदत मिळते. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, फुग्यांच्या माध्यमातून संदेश पाठवणाऱ्या संस्थांचं मत आहे की, पुढेही ते हे करत राहणार आणि नुकतीच त्यांनी एक मिलियन फुग्यांची ऑर्डर दिली आहे.

तसं हे नॉर्थ आणि साउथ कोरियातील हे फुग्याचं आंदोलन फार जुनं आहे. 1950 मध्ये कोरियन वॉर दरम्यान 2.5 खबर लीफलेट्स पकडले गेले होते. असेही मानले जाते की, फुग्यांमध्ये टाकले जाणारे लीफलेट्स इतके जास्त होते की, त्यांनी संपूर्ण कोरिया झाकला गेला असता.

नंतर 2004-2010 मध्ये फुग्यांचं युद्ध बंद होतं. केवळ फुग्यांनीच नाही तर दोन्ही देशांच्या सीमांवर मोठ्या आवाजात स्पीकर लावणे, ज्यांवर किम विरोधात भाषणे चालत. किंवा रेडिओ ब्रॉडकास्टही बंद केलं होतं. 2018 मध्ये हे बलून वॉर बंद करण्याबाबत दोन्ही देशांनी सांगितले होते. पण ते अजूनही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर उडवले जाणाऱ्या फुग्यांची संख्या वाढल्यानं किम जोंगच्या बहिणीने साउथ कोरियाला धमकी दिली होती. पण हे सुरू आहे.