जगात 'या' देशाच्या राजधानीचं नाव सर्वात मोठं, ऐकून व्हाल हैराण; भारताशीही आहे अतूट नातं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:36 PM2021-08-01T19:36:22+5:302021-08-01T19:49:30+5:30

जगात जवळपास सर्वच देशांची ओळख तेथील काहीतरी विशिष्ट गोष्टींवरुन केली जाते. पण जगातील एका देशाच्या राजधानीचं मूळ नाव इतकं मोठंय की ते सलग वाचताही येत नाही.

एखादा देश तेथील उंचच पर्वत रांगांमुळे, एखादा सुंदर नद्या, धबधब्यांनी ओळखला जातो. तर एखादा देखील तेथील पर्यटन स्थळांमुळे ओळखला जातो. पण आज आपण अशा एका देशाची माहिती घेणार आहोत की जी अतिशय रोमांचक आहे.

जगभरातील पर्यटकांचं ते आवडीचं ठिकाण आहे. पर्यटनावर या देशाचा आर्थिक गाडा चालतो. या देशाचं नाव आहे थायलंड

थायलंड देश आधी सियाम या नावानं ओळखला जायचा. १९४८ साली देशाचं नाव बदलून ते थायलंड करण्यात आलं. बौद्ध धर्मियांच्या मंदिरांसाठी हा देश प्रसिद्ध आहे. कारण देशात ९५ टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.

विशेष म्हणजे बौद्ध धर्मियांचं प्रमाण जास्त असलं तरी येथे आजही भगवान राम आणि विष्णूची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते.

गरूड हे या देशाचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखलं जातं आणि आपल्याला माहितच असेल की भगवान विष्णूचं गरूड हे वाहन मानलं जातं.

ऐकून आश्चर्य वाटेल की थायलंडच्या राष्ट्रीय ग्रंथाचं नाव 'राम कियेन' असं आहे की जे रामायणचं थाई भाषेतील भाषांतर आहे.

थायलंडची राजधानी बँकॉक देशातील सर्वात जास्त तापमानाच्या शहरांपैकी एक शहर आहे. एप्रिल महिन्यात या शहरात वातावरण सर्वाधिक असतं. या महिन्यात इथं सोंगक्रन नावाचा सण साजरा केला जातो की जो होळीसारखा असतो. फक्त लोक इथं रंगांऐवजी पाण्याचा वापर करतात.

येथील लोकांमध्ये अंधश्रद्धेचंही खूप मोठं प्रमाण आहे. भूत-प्रेतांवर येथील बहुतेक लोक विश्वास ठेवतात आणि त्यांच्यापासून संरक्षणसाठी घरात एक वेगळी खोली तयार करतात.

क्रुंग देवमहानगर अमररत्नकोसिन्द्र महिन्द्रायुध्या महातिलकभव नवरत्नराजधानी पुरीरम्य उत्तमराजनिवेशन महास्थान अमरविमान अवतारस्थित्य शक्रदत्तिय विष्णुकर्मप्रसिद्धि, हे बँकॉक शहराचं पूर्ण नाव आहे. हे पाली आणि संस्कृत भाषेत याचं मूळ दडलेलं आहे.