धक्कादायक...कार्टून नेटवर्कवर सलग तीन दिवस दिसत होते अश्लील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 08:02 PM2019-05-10T20:02:03+5:302019-05-10T20:04:41+5:30

लहान मुलांचा सर्वाधिक पसंतीचा चॅनेल कार्टून नेटवर्कच्या वेबसाईटवर तब्बल तीन दिवस अश्लिल व्हिडीओ दाखविले जात होते. जगभरातील 16 देशांमध्ये कार्टून नेटवर्कची वेबसाईट हॅक झाली होती. ब्राझीलच्या दोन हॅकरनी हा प्रताप केलेला आहे.

हॅकरनी या वेबसाईटवरून अरेबिक मीम्स, ब्राझीलियन हिप-हॉप सॉन्गसह ब्राझीलियन मेल स्ट्रिपर्स व्हिडीओही दाखविले होते. कार्टून नेटवर्कवर अश्लिल व्हिडीओ पाहून पालकही संताप व्यक्त करत आहेत. युरोप, रशियातील देशांमध्ये कार्टून नेटवर्क पूर्ण आठवडा सुट्टीवेळी हॅक करण्यात आलेले होते. दुसरीकडे कार्टून नेटवर्कने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

एका वृत्तानुसार दोन हॅकर्सनी ऑफ्रिका, अरब, ब्राझील, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, जर्मनी, हंगेरी, इटली, मेक्सिको, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, रोमानिया, रशिया आणि तुर्कीमध्ये कार्टून नेटवर्क हॅक करण्यात आले होते. याबाबतचा खुलासा गेल्या 25 एप्रिलला झाला आहे.

हॅकर्सचा हल्ला झाल्याचे समजल्यानंतर कंपनीने वेबसाईट बंद केली आणि नवीन वेबसाईट दिली. तोपर्यंत लोकांनी ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर केले होते. यावर अॅडल्ट व्हिडीओ दिसत आहेत.

हॅकर्सनी केलेल्या दाव्यानुसार कार्टून नेटवर्कच्या इतर वेबसाईटही ते हॅक करू शकतात. मात्र, इतरत्र कुठेही वेबसाईट हॅक झाल्याचे वृत्त नाही.

टॅग्स :रशियाrussia