Coronavirus : देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाची WHO ला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 01:35 PM2021-06-22T13:35:12+5:302021-06-22T13:45:26+5:30

Coronavirus In North Korea : जगभरात आतापर्यंत लाखो लोकांचा झालाय कोरोनामुळे मृत्यू. उत्तर कोरियात एकही रुग्ण नसल्याचा दावा.

Coronavirus In North Korea Kim Jong Un : कोरोनाच्या महासाथीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करत आहे.

परंतु दुसरीकडे उत्तर कोरियानं मात्र मोठा दावा करत आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा केला आहे.

उत्तर कोरियानं जागतिक आरोग्य संघटनेला (World Health Organization) यासंदर्भातील माहिती दिली आहे.

१० जून ते ३० जूनपर्यंत ३० हजार नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु देशात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचं उत्तर कोरियानं स्पष्ट केलं आहे.

उत्तर कोरियाच्या आकडेवारीनुसार ४ जून ते १० जूनदरम्यान ७३३ लोकांची तापासणी करण्यात आली. यापैकी १४९ लोकांना इन्फ्ल्यूएन्झासारखे आजार किंवा श्वसनाच्या आजाराची समस्या होती, असं जागतिक आरोग्य संघटनेनं एका सर्व्हिलिअन्स रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, देशात एकही कोरोना रुग्ण नाही या उत्तर कोरियाच्या दाव्यावरही शंका असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान उत्तर कोरियाची आरोग्य व्यवस्था चांगली नाही, याशिवाय आर्थिक जीवनरेषा मानली जाणारी त्याची सीमाही चीनसोबत लागून आहे, असंही त्यात म्हटलं आहे.

उत्तर कोरियानं आपल्या प्रयत्नांना राष्ट्रीय अस्तित्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय पर्यटकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

याशिवाय डिप्लोमॅट्सनाही भारताच्या बाहेर पाठवलं आहे. तर दुसरीकडे सीमेवरी ये-जा आणि व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

परंतु उत्तर कोरियात असलेल्या या लॉकडाऊनसारख्या स्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण आला आहे.

याशिवाय गेल्या अनेक दशकांपासून देशातील अण्विक कार्यक्रम आणि गैरव्यवस्थापनाचा ठपका ठेवत अमेरिकेनंही निर्बंध लादले होते. त्याचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या कालावधीपुरतं लॉकडाऊनसाठी तयार राहण्यास सांगितलं होतं.