'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:53 AM2021-07-24T10:53:46+5:302021-07-24T11:03:03+5:30

oldest sex workers Louis and Martin Fokken: यांच्यावर एक डॉक्यूमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचे नाव 'मीट द फोक्केन्स', असे आहे. यात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अनुभव सांगण्यात आला आहे.

नेदरलँड्सची (Netherlands) राजधानी एम्स्टर्डम (Amsterdams) आपल्या बदनाम रेड लाइट गल्ल्यांसाठी (Red Light Areas) ओळखली जाते. लोग आपल्या सर्व वाइल्ड फॅन्टसीसाठी या गल्ल्यांमध्ये येतात. (Netherlands Meet the oldest sex workers in world, who claims 100 years service)

येथील सेक्स वर्कर्सचा दावा आहे, की आपल्याला रोजच्या रोज अनेक लोकांना सर्व्हिस द्यावी लागते. असा एकही दिवस जात नाही, की आपल्याला सर्व्हिस द्यावी लागत नाही.

एकवेळ येथे लोक जेवन विसरतील, पण रेड लाइट एरियात येणे विसरत नाहीत. याच बदनाम गल्ल्यांमधून आता जुळ्या बहिणी समोर आल्या आहेत.

या बहिणींना 2012 मध्ये जिल्ह्यातील ओल्डेस्ट विंडो गर्ल्स (Oldest Window Girls)चा टॅग मिळाला आहे. आपण जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. यांचा अनुभव एकत्र केल्यास तो तब्बल 100 वर्ष एवढा होतो.

एम्स्टर्डमच्या या जुळ्या बहिणी लुइस (Louis) आणि मार्टिन फोक्केन (Martin Fokken) यांनी दावा केला आहे, की या दोघीही गेल्या एक शतकापासून (एकत्रित अनुभव) सेक्स इंडस्ट्रीत काम करतात. या दोघींनीही 2012 मध्येच या कामापासून निवृत्ती घेतली आहे.

यांच्यावर एक डॉक्यूमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचे नाव 'मीट द फोक्केन्स', असे आहे. यात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अनुभव सांगण्यात आला आहे. आता आपल्या वयाच्या सत्तरीत पोहोचलेल्या या बहिणी लोकांसोबत आपला अनुभव शेअर करत आहेत.

सेक्स इंडस्ट्रीत असं ठेवलं पाऊल - या बहिणींनी The Guardian सोबत बोलताना सांगितले, की त्या या इंडस्टीमध्ये कशा आल्या? लुइसने सांगितले, जेव्हा ती 20 वर्षांची होती, तेव्हा तिचा पती तिला भर रस्त्यांत मारहाण करायचा. तो लुइसवर पैसे कमावण्याचा दबाव टाकत होता. यानंतर, आपल्या मुलांसाठी तिला सेक्स इंडस्ट्रीत उतरावे लागले.

तसेच, लुइसची बहीण मार्टिन सुरुवातीला रेड लाइट एरियामध्ये झाडे लावण्याचे काम करत होती. मात्र, काही पुरुषांची नजर तिच्यावर पडली आणि तिच्याकडे सर्व्हिसची डिमांड करण्यात आली. यानंतर ती आपल्या बहिणीसोबतच या इंडस्ट्रीचा भाग बनली.

सेक्सवर्कर्स झाल्याचा खेद नाही - आपल्याला सेक्सवर्कर्स झाल्याचा खेद नाही, असे या बहिणी सांगतात. या दोन्ही बहिणी सोबत होत्या म्हणूनच त्यांना या इंडस्ट्रीत एकमोकांची साथ मिळाली. त्यांनी BBC ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या आठवणी मिळाल्या आहेत. या दोघींनीही आता रिटायरमेंट घेतली आहे.

यांपैकी सर्वप्रथम लुइसने अर्थराइटिसमुळे जॉब सोडला. यानंतर मार्टिननेही रिटायरमेंट घेतली. या दोघी सांगतात, की वेळेनुरूप या इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे आणि आज ही इंडस्ट्री अत्यंत सुरक्षित आहे.

Read in English