अशी आहे Twitter चे नवे CEO पराग अग्रवाल यांची Love Life; जाणून घ्या, पत्नी विनीता आणि फॅमिलीबद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 11:42 AM2021-11-30T11:42:58+5:302021-11-30T12:02:58+5:30

अमेरिकेत गेल्यानंतर पराग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडीही केली. विनिता यांनीही याच विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सोमवारी सीईओ पदाचा राजीनामा दिला. आता भारतीय-अमेरिकन पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असणार आहेत. यापूर्वी, पराग हे या कंपनीत चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. ((Photo - paraga (Parag Agrawal) Instagram))

पराग यांनी आयआयटी, मुंबई येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. याहू आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 2011 मध्ये त्यांनी ट्विटर जॉईन केले.

ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यांनी त्यांच्या लॉन्ग टाइम पार्टनर विनीता अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर, जानेवारी 2016 मध्ये त्यांनी लग्न केले. सध्या दोघेही सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे राहतात. त्यांना अंश नावाचा एक मुलगाही आहे. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

विनिता अग्रवाल यांच्या ट्विटर प्रोफाइलनुसार, त्या स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये फिजिशियन आणि असिस्टंट क्लिनिकल प्रोफेसर आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

विनिता यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडीही केली आहे. विनीत या "बिगहॅट बायोसायन्स"सोबतही काम करतात. विनिता यांनी आतापर्यंत वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रात खूप काम केले आहे. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

यापूर्वी, विनिता फ्लॅटिरॉन हेल्थमध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी येथे नॅशनल स्केल डेटाबेसच्या डेव्हलपमेंटचे काम केले. येथे रिसर्च आणि ड्रग डेव्हलपमेंटसाठी क्लीनिकल आणि जिनोमिक डेटाचे संकलन केले जाते. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

विनीता यांनी इंस्टिट्यूट ऑफ हारवर्ड अँड एमआयटीतून जेनेटिक बेसिस ऑफ कॉमन डिसीजचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी अँड लॉरेंस लीव्हमोर नॅशनल लॅबोरेटरीतून कॉम्प्यूटेशनल रिसर्चदेखील केला आहे. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

पराग हे सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच पत्नी विनितासोबतचे फोटो अपलोड करत असतात. पराग यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून दिसून येते की, त्यांना प्रवासाची अत्यंत आवड आहे. त्यांनी विनितासोबतच्या सुंदर डेस्टिनेशनचे काही फोटोही अपलोड केले आहेत. एवढेच नाही, तर आई-वडिलांचा एक फोटोही त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

पराग यांचा जन्म भारतातच झाला आणि त्यांचे बालपन भारतातच गेले. आयआयटी मुंबई येथून शिक्षण घेतल्यानंतर पराग करिअरच्या दृष्टीने अमेरिकेत गेले. ते बी.टेक इंजिनीअर आहेत. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

अमेरिकेत गेल्यानंतर पराग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडीही केली. विनिता यांनीही याच विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. (Photo - paraga (Parag Agrawal) Instagram)

Read in English