सलाम! उपचार करताना डॉक्टर महिलेला संसर्ग झाला; कोरोनाबाधितांची सेवा करत करत प्राण सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 09:30 PM2020-03-22T21:30:35+5:302020-03-22T21:39:00+5:30

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं सर्वत्र दहशत निर्माण केलीय.

चीनमध्ये हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनानं आता इटली, इराणमध्ये धुमाकूळ घातलाय.

इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

तब्बल २० हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्यानं इराणची अवस्था अतिशय वाईट झालीय.

कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्यानं इराणमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय.

इराणमधील एका महिला डॉक्टरचा रुग्णांवर उपचार करता करताच मृत्यू झालाय.

डॉ. शिरीन रुहानी यांचा कोरोनाबाधितांवर उपचार करताना मृत्यू झाला.

रुग्णांवर उपचार करता करता शिरीन यांची प्रकृती खालावत होती. मात्र तरीही आयव्ही लावून त्या रुग्णसेवा करत होत्या.

रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्यानं, डॉक्टरांची संख्या कमी असल्यानं शिरीन विविध रुग्णालयांमध्ये फिरत होत्या. रुग्णांवर उपचार करत होत्या.

आधीच प्रकृती ठीक नसल्यानं शिरीन यांना कोरोनाची लागण झाली. मात्र तरीही त्या रुग्णांवर उपचार करत राहिल्या.

अखेर शिरीन यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला. रुग्णसेवेची शपथ घेतलेल्या शिरीन यांनी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची शपथ पाळली.