Invisible Shield: तुम्हाला Mr. India बनवेल हे अदृश्य कवच, आलं नवं भन्नाट तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:56 PM2022-04-11T15:56:12+5:302022-04-11T16:01:39+5:30

Invisible Shield: मिस्टर इंडिया चित्रपटात तुम्ही अनिल कपूरला गायब होताना पाहिलं असेलच. आता ब्रिटिश कंपनी इनव्हिजिब्लिटी शिल्ड को ने एक असं कवच विकसित केलं आहे. ज्याच्या मागे उभे राहिल्यानंतर उभीर राहिलेली व्यक्ती दिसत नाही, तर त्याच्या मागे असलेलं बॅकग्राऊंड दिसतं. म्हणजेच तुम्ही त्या शिल्डच्या मागे दिसणाऱ्या व्यापक दृष्यामधून गायब होता. या धमाल तंत्रज्ञानाला कंपनीने इनव्हिजिबल शिल्ड असं नाव दिलं आहे.

मिस्टर इंडिया चित्रपटात तुम्ही अनिल कपूरला गायब होताना पाहिलं असेलच. आता ब्रिटिश कंपनी इनव्हिजिब्लिटी शिल्ड को ने एक असं कवच विकसित केलं आहे. ज्याच्या मागे उभे राहिल्यानंतर उभीर राहिलेली व्यक्ती दिसत नाही, तर त्याच्या मागे असलेलं बॅकग्राऊंड दिसतं. म्हणजेच तुम्ही त्या शिल्डच्या मागे दिसणाऱ्या व्यापक दृष्यामधून गायब होता. या धमाल तंत्रज्ञानाला कंपनीने इनव्हिजिबल शिल्ड असं नाव दिलं आहे.

इनव्हिजिबल शिल्ड म्हणजे अदृश्य कवच. हे कवच हाय रेझोल्युशन इनव्हिजिब्लिटी प्रदर्शित करते. त्याच्या मागे प्रकाश परावर्तित होण्याचे विज्ञान आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे एवढा मोठा अविष्कार करणारी कंपनी सध्या क्राऊड फंडिंगच्या स्टेजला आहे. मात्र या कंपनीने हा चमत्कार करून दाखवला आहे.

इनव्हिजिबल शिल्ड म्हणजे खरंतर एक पारदर्शक दिसणारा प्लॅस्टिक पॅनल आहे. ज्याला कुठल्याही प्रकारच्या बाह्य उर्जा किंवा इलेक्ट्रिक चार्जिंगची आवश्यकता भासत नाही. अदृश्य करणाऱ्या इतर तंत्रज्ञानामध्ये असलेल्या शक्तिशाली आणि गुंतागुंतीच्या ऑप्टिकल लेन्सऐवजी हे शिताफीने प्रकाशाला परावर्तित करते. त्यामुळे याच्या मागे असलेली व्यक्ती गायब होते.

इनव्हिजिबल शिल्ड बघायला गेलं तर पारदर्शक दिसते. मात्र ती याच्या मागे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीचं अंधुक चित्र दाखवत राहते. मात्र याच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीचे कपडे आणि प्रकाशाची स्थिती या अंधुकपणाला पूर्णपणे पारदर्शक बनवू शकते. ही शिल्ड विकसित करणाऱ्या कंपनीचा दावा आहे की, तुम्ही शिल्डच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला ५ मीटर असो वा १०० मीटरवरून या मागची व्यक्ती दिसणार नाही.

ही शिल्ड विज्ञानाच्या लेंटिकुलर प्रिंटिंग तंत्रावर काम करते. हे थ्री डायमेन्शन फोटोंप्रमाणे आहे. ज्यामध्ये तुम्ही एका बाजूने पाहिले तर काही वेगळे दिसते. तर दुसऱ्या बाजूने पाहिले तर काही औरच दिसते. कंपनीने द किकस्टार्टर नावाच्या साईटवर लिहिले आहे की, खरंतर शिल्ड ही बहुतांश प्रकाशाला पाहणाऱ्याच्या रेषेपासून दूर फेकते. ते प्रकाशाला डाव्या-उजव्या बाजूकडे रिफ्लेक्ट करते. त्यामुळे समोर असलेली व्यक्ती दिसत नाही.

त्यामुळे पाहणाऱ्याला जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला शिल्डच्या मागे उभी असलेली व्यक्ती दिसत नाही, तर त्याच्या मागे असलेले बॅकग्राऊंड दिसते. हे बॅकग्राऊंट हॉरिझॉन्टली सेट होते. त्यामुळे तिथे मागे असलेली व्यक्ती दिसत नाही. या प्रोजेक्टसाठी ६ एप्रिल २०२२ पर्यंत क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आतापर्यंत १.६२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळालेली आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचे तंत्र विकसित करण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक उत्पादनांमध्ये बऱ्याच समस्या होत्या. काही तर चर्चेत आल्यावर अचानक गायबही झाली. या क्षेत्रामध्ये राहिलेल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न इनव्हिजिब्लिटी शिल्डने केला आणि हे अदृश्य कवच तयार केले.

कंपनीने आतापर्यंत २५ इनव्हिजिबल शिल्ड तयार केल्या आहे. मात्र त्यांनी सांगितले की ते अजून निधी जमा करत आहेत. जेणेकरून अधिकाधिक शिल्ड तयार करता येतील. हे शिल्ड दोन आकारांमध्ये तयार केल्या जाणार आहेत. त्यातील छोट्या आकाराच्या शिल्डची किंमत ही ६४ डॉलर म्हणजे ४८५८ रुपये आणि दुसऱ्या मोठ्या शिल्डची किंमत ३९१ डॉलर्स म्हणजेच २९ हजार ६७८ रुपये एवढी आहे.

आश्चर्यकारक बाब म्हणजे ही शिल्ड पूर्णपणे रिसायकलेबल आहे. त्यामुळे खराब झाल्यावर फेकून दिल्यास त्यापासून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही.