'या' महिलेला देण्यात आला सर्वात परफेक्ट फिगरचा खिताब, चाळीशीनंतरही दिसते इतकी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:43 PM2022-02-09T16:43:38+5:302022-02-09T16:58:47+5:30

Kelly Brook : यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी केली ब्रुकला परफेक्ट बॉडी असलेली महिला घोषित केलं आहे.

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्यांची बॉडी एकदम परफेक्ट असावी. यासाठी ते खाण्या-पिण्यापासून ते एक्सरसाइजपर्यंत रूटीन ठरवतात. तरी सुद्धा प्रत्येकाला हवी तशी मनासारखी बॉडी मिळत नाही.

तेच काही लोक असे असतात ज्यांना परफेक्ट बॉडी देवाने गिफ्ट दिलेली असते. अशीच एक महिला टीव्ही प्रेझेंटर आणि हॉलिवूड अभिनेत्री केली ब्रुक (kelly brook) आहे.

केली ब्रुकबाबत एक आश्चर्यजनक रिसर्च समोर आला होता. ज्यात तिला जगातील सर्वात परफेक्ट बॉडी असलेली महिला सांगण्यात आलं.

यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी केली ब्रुकला परफेक्ट बॉडी असलेली महिला घोषित केलं आहे.

रिसर्चमध्ये शरीर आणि केसांची लांबी, चेहऱ्याचा आकार, वजनासहीत अनेक पॅरामीटर्सवरून हे निष्कर्ष काढण्यात आला. रिसर्च पूर्ण झाल्यावर नैसर्गिक रूपाने सुंदर सांगण्यात आलं.

केली ब्रुकने कधी प्लास्टिक सर्जरी केली नाही. तिच्या जवळच्या लोकांचं असं मत आहे की, देवाने जेव्हा तिला बनवलं आहे, त्यामुळे प्लास्टिक सर्जरीची तर तिला गरजच नाहीये.

ब्रिटनचं फॅशन मॅगझिन FHM ने २००५ मध्य केलीला 'सेक्सिएस्ट वुमन इन द वर्ल्ड' किताब दिला होता. मॅगझिनच्या या सर्व्हेमध्ये दीड कोटीपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला होता.

केलीने वयाची चाळीशी पार केली आहे. २०२० मध्ये वाढलेल्या वजनावर केली ब्रुक म्हणाली होती की, गेले काही दिवस माझ्यासाठी वाईट गेले. मी आता फिट आणि आनंदी आहे.

शरीर आणि वयासोबत आत्मविश्वास येतो. केली १९९७ मध्ये पहिल्यांदा १९९७ मध्ये म्युझिक व्हिडीओत दिसली होती. त्यानंतर तिने टीव्ही प्रेझेंटर म्हणून काम केलं. केली ब्रुकचं नाव अनेक वादातही अडकलं.