खुशखबर...वर्षभर विमान प्रवास मोफत; फक्त इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:26 PM2019-03-04T13:26:25+5:302019-03-04T13:47:15+5:30

आज जगभरात अनेकजण इन्स्टाग्राम हे अॅप वापरतात. काहींना तर प्रत्येक क्षणांचे फोटो इन्स्टावर शेअर करण्याची सवय लागलेली आहे. मात्र, हेच काही शेकड्यांमध्ये असलेले पोस्ट डिलीट करण्यास सांगितले तर...नाही करणार ना...तुम्ही कराल...कारणही तसेच आहे. सारे पोस्ट डिलीट केल्यास तुम्हाला 1 वर्षाचा विमान प्रवास मोफत करता येणार आहे. आहे की नाही भन्नाट ऑफर.

जेट ब्ल्यू ही विमान सेवा पुरविणारी कंपनी ही ऑफर देत आहे. यासाठी तुम्हाला आजवरचे सारे पोस्ट डिलीट करावे लागणार आहेत. जेट ब्ल्यू ही अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. या ऑफरची माहीती कंपनीने स्वत: व्टिट करून दिली आहे. या ऑफरचे नाव ऑल यू कॅन जेट असे ठेवण्यात आले आहे.

कंपनीच्या पोस्टनुसार या ऑफरचा शेवटचा दिवस 8 मार्च आहे. या दिवसापर्यंत तुम्हाला या ऑफरमध्ये भाग घ्यायचा आहे. यासाठी तुमच्या फोनच्या ब्राऊजरमध्ये https://www.jetblue.com/aycj/ कॉपी पेस्ट करा.

यानंतर तुमच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट डिलीट कराव्या लागणार आहेत. याचे स्क्रीनशॉट जेटब्ल्यूच्या लिंकवर अपलोड करावे लागतील. तसेच ऑल यू कॅनया नावाने असलेला रकानाही भरावा लागणार आहे. यानंतर कंपनीच्या टेम्पलेटसह कंपनीला टॅग करून इन्स्टाग्रामवर पोस्ट करावी लागणार आहे.

या योजनेची सुरुवात कंपनीने 27 फेब्रुवारीला केली होती. यानंतर हजारो लोकांनी त्यांचे प्रिय असलेले फोटो आणि त्यावरील कमेंट, लाईक्सवर पाणी सोडले आहे.

टॅग्स :विमानairplane