ब्लादिमीर पुतिनसमोर आउट ऑफ कंट्रोल झाली फीमेल Anchor, तिच्या विचित्र हावभावांची देशभरात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:46 PM2021-10-19T12:46:25+5:302021-10-19T12:55:29+5:30

सीएनबीसीच्या हेडली गॅंबल (Hadley Gamble) मॉस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मॉडरेटर म्हणून उपस्थित होती. पुतिन यांनी प्रश्न विचारत असताना ती अजब हावभाव करत राहिली.

रशियात (Russia) एक अमेरिकन फीमेल अ‍ॅंकर (US Female Anchor) चर्चेचा विषय ठरली आहे. कारण आहे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत मुलाखतीत बोलताना तिच्या विचित्र हालचाली. स्थानिक मीडियाने तर हेही म्हटलं की, अ‍ॅंकरने स्वत:ला सेक्स ऑब्जेक्ट म्हणून सादर केलं.

सीएनबीसीच्या हेडली गॅंबल (Hadley Gamble) मॉस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मॉडरेटर म्हणून उपस्थित होती. पुतिन यांनी प्रश्न विचारत असताना ती अजब हावभाव करत राहिली.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, 'एनर्जी फोरम'च्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) उपस्थित होते. यादरम्यान सीएनबीसीच्या हेडली गॅंबलने राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारले. जेव्हा पुतिन आपलं म्हणणं मांडत होते तेव्हा गॅंबल विचित्रपणे आपले पाय हलवत होती.

अनेकदा तर तिने थेट राष्ट्राध्यक्षांकडे पाय केले. इतकंच नाही तर तिने जीभ काढूनही इशारे केल्याचं बोललं जात आहे. रशियन मीडियाने सांगितलं की, यूएस अ‍ॅंकरने स्वत:ला सेक्स ऑब्जेक्ट म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला.

पुतिन यांचे Propagandist व्लादिमीर सोलोविओव स्थानिक मीडियासोबत बोलताना म्हणाले की, सीएनबीसीच्या हेडली गॅबलने राष्ट्राध्यक्षांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.

हेडली यांचं वागणं अस्वीकार्य आहे. तिचा व्यवहार पाहून असं वाटत होतं की, जणू कुणीतरी राष्ट्राध्यक्षांसमोर स्वत:ला सेक्स ऑब्जेक्ट म्हणून सादर करत आहे. तिला याचीही भीती नव्हती की, यामुळे तिच्यावर टिका होईल'.

हेडली गॅंबलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर न्यूजपेपरमध्ये प्रकाशित तिचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिचे विचित्र हावभाव दाखवण्यात आले आहेत. तिने याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माय बेस्ट अॅंगल'.

हेडलीने यूरोप गॅस संकटबाबत पुतिन यांना प्रश्न विचारला होता. यावर जेव्हा त्यांनी उत्तर देण्यास सुरूवात केली. तेव्हा हेडलीने विचित्र हावभाव करणे सुरू केले. कधी ती पाय हलवत होती तर कधी विचित्र हावभाव देत होती. यावरूनच सध्या रशियात चर्चा सुरू आहे.