नेपाळमधलं भगवान शंकराचं हे प्रसिद्ध मंदिर आवर्जून पाहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 06:47 PM2017-10-10T18:47:57+5:302017-10-11T16:14:09+5:30

पशुपतिनाथाच्या मंदिराला जगभरातून भाविक व पर्यटक भेट देतात. तसेच पशुपतिनाथाचं हे मंदिर युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतही समाविष्ट आहे.

भगवान शंकराच्या दुस-या मंदिरांच्या तुलनेत हे मंदिर काहीसं विशेष आहे. असं म्हणतात, भगवान शंकर साक्षात इथे विराजमान आहेत.

पशुपतिनाथाचं मंदिर नेपाळमधील काठमांडूच्या पूर्व भागातील बागमती नदीच्या किना-यावर आहे. हिंदू धर्मातील आठ सर्वात पवित्र स्थळांपैकीच हे एक मंदिर आहे.

पशुपतिनाथाच्या मंदिराला जगभरातून भाविक व पर्यटक भेट देतात. तसेच पशुपतिनाथाचं हे मंदिर युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतही समाविष्ट आहे.

काठमांडूमध्ये बागमती व विष्णुमती नद्यांचा संगम होतो तिथे हे मंदिर एक मीटर उंच चबुत-यावर विराजमान आहे. मंदिराच्या चारही बाजूला पशुपतिनाथांच्या समोरच चार दरवाजे आहेत.

टॅग्स :मंदिरTemple