Drugs: 10 अब्ज रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात ऑलिम्पिक खेळाडूला 25 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:30 AM2021-07-30T11:30:12+5:302021-07-30T11:36:54+5:30

कोर्टाने याप्रकरणी नेथन बगालेला 25 आणि त्याचा भाऊ ड्रू बगालेला 28 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेथन बागलेला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 45 वर्षीय नेथननं दोनदा ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकलं आहे. दरम्यान, याप्रकरणी नेथनसह त्याचा भाऊ ड्रू बगालेलाही 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांना पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी 10 अब्ज रुपयांच्या कोकेनसह पकडलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रू आणि त्याच्या एका साथीदारानं शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन जहाजातून 652 किलो कोकेन आणलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या सीमेत प्रवेश करताना नेव्हीनं त्यांना पाहिलं आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान त्या दोघांनी कोकेनचे पॅकेट समुद्रात टाकणे सुरू केले, पण पोलिसांनी त्यांना पकडलं आणि 30 पॅकेट जप्त केले.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पोलिस किंवा नेव्हीला ट्रॅक करण्यासाठी या दोघांनी बोटीमध्ये जीपीएस ट्रॅकर आणि सॅटेलाइट फोनचा वार केला होता. दरम्यान, पोलिसांनी जप्त केल्या या 650 किलो व्हाइट पावडरमध्ये 512 किलो प्यीयोर कोकन होतं. बाजारात त्या कोकेनची किंमत 95 ते 147 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 10 अब्ज रुपये होती. याप्रकरणी नेथनला 2019 मध्ये पोलिसांनी अटक केली होती.

कोर्टात सुनावणीरम्यान न्यायाधीश एन लॉयन्स म्हणाले की, नेथनने पैसे कमावण्याच्या हव्यासापोठी या अमली पदार्थांच्या व्यापाराला अतिशय गांभीर्याने घेतलं होतं. तसेच, या प्रकरणात कोर्टाने नेथन आणि त्याचा भाऊ ड्रूला मुख्य आरोपी ठरवत शिक्षा सुनावली.

नेथन आणि ड्रूच्या वकीलानं कोर्टात युक्तीवाद केला की, त्या दोघांना पॅकेटमध्ये ड्रग्स असल्याची माहिती नव्हती. त्यांना त्या पॅकेटमध्ये तंबाखू आहे, असं वाटत होतं. परंतु न्यायालयानं या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आणि या मिशनच्या मदतीने बगाले बंधुंना खूप श्रीमंत व्हायचं आहे, असं म्हटलं.

तसेच, या दोन्ही भावांचे क्रिमीनल नेटवर्क अनेक शहरात पसरले असून, यापूर्वीही या दोन भावांना ड्रग्स प्रकरणात शिक्षा झाली असल्याचं कोर्टानं म्हटलं. कोर्टाने याप्रकरणी नेथनला 25 वर्षांची आणि ड्रूला 28 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, नेथन 12 वर्षे आमि ड्रू 16 वर्षांपर्यंत जामीनासाठी अर्ज करू शकणार नाही.

नेथन बगालेने तीन वेळा कायाकिंग वर्ल्ड चँपियन जिंकली आहे. 2005 मध्ये प्रतिबंधीत औषधं बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2007 मध्ये पोलिसांनी नेथनच्या कारमधून 800 एक्सटेसी ड्रग्स टॅबलेट आणि गांजा जप्त केला होता.

2009 मध्येही नेथनवर 1500 एक्सटेसी गोळ्या बनवून बाजारात विकल्याचा आरोप लागला होता. त्यानंतर 2013 मध्ये सायकेडेलिक ड्रग 2सीबीची 18 हजार गोळ्या तयार करण्यात मदत करणे आणि विकल्याप्रकरणी अटक झाली होती.