बंद होऊ शकते Tesla कंपनी! चीनच्या या पावलामुळे Elon Musk यांनी व्यक्त केली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:12 PM2021-03-20T21:12:38+5:302021-03-20T21:20:00+5:30

Elon Musk Tesla : पाहा का म्हणाले मस्क असं, काय आहे त्यामागील कारण

चीनच्या लष्करानं आपल्या काही केंद्रांवर Tesla च्या कार्सच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी Elon Musk यांनी आपली कंपनी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली.

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या मस्क यांचा समावेश आहे. जर टेस्लाच्या कार्स हेरगिरीसाठी वापरल्या गेल्या तर त्यांची कंपनी बंद होऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

केवळ चीनच नाही तर जगातिल कोणत्याही देशात असे प्रकार घडल्यास टेस्ला कंपनी बंद होऊ शकते. टेस्लाच्या विक्रीचा ३० टक्के हिस्सा हा केवळ चीनमध्येच आहे.

नुकतंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी लष्करानं टेस्लाच्या कार्स आपल्या कॉम्प्लेक्समध्ये घुसण्यास मनाई केली होती.

चिनी लष्करानुसार टेस्लाच्या कार्समध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं.

जगातील सर्वात मोठी कारची बाजारपेठ चीन ही आहे. तसंच इलेक्ट्रीक वाहनांसाठीही जगातील कंपन्यांसाठी ती एक महत्त्वाची बाजारपेठ आहे.

टेस्लानं गेल्या वर्षी चीनमध्ये १ लाख ४७ हजार ४४५ कार्सची विक्री केली होती. जगात टेस्लाच्या कार्सच्या विक्रीच्या ती ३० टक्के इतकी होती.

तसंच या वर्षी टेस्लाला चीनची एक कंपनी नियो इंककडूनही टक्कर मिळत आहे. टेस्ला चीनमध्ये न केवळ आपल्या कार्सची विक्री करते, याशिवाय त्या ठिकाणी कारचं उत्पादनही करते.

२०१९ मध्ये त्यांनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याशी मंदळ ग्रह आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर चर्चा केली होती.

गेल्या वर्षी चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या टेस्लाच्या मॉडेल-३ सेडान्सच्या डिलिव्हरी इव्हेंटमध्ये मस्क यांनी स्टेजवर डान्सही केला होता. यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं होतं.