#DoNotTouchMyClothes: अफगाणिस्तानी महिलांचे तालिबान्यांना थेट आव्हान; सुरू केलं जगावेगळं आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:01 PM2021-09-14T14:01:31+5:302021-09-14T14:05:37+5:30

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. तालिबानीवादी वृत्तीच्या विरोधात अफगाणिस्तानी महिला एकवटल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes ही चळवळ सुरू केली आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. महिलांचा पेहराव, शिक्षण, कोणत्या क्षेत्रात काम करायचे, काम करायचे की नाही... हे सर्व आता तालिबानी ठरवत असल्याचे दिसत आहेत. पण, याच तालिबानीवादी वृत्तीच्या विरोधात अफगाणिस्तानी महिला एकवटल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes ही चळवळ सुरू केली आहे.

तालिबान्यांनी महिलांसाठी जाहीर केलेल्या नव्या ड्रेस कोड विरोधात ही चळवळ आहे आणि यात महिलांनी बुरख्याएवजी अफगाणी संस्कृतीचा पेहरावा परिधान करून स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांनी त्याखाली #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture हे हॅशटॅगही वापरले आहेत.

अफगाणिस्तानच्या महिलांनी सोशल मीडियावर रंगबेरंगी व पारंपरिक पेहरावा घातलेले फोटो पोस्ट केले आहेत. याआधी महिलांनी तालिबान्यांच्या बुरखा घालण्याच्या फतव्याविरोधात निदर्शनही केली. काबुलमध्ये त्याविरोधात रॅलीही काढण्यात आली होती.

अमेरिकन युनिव्हर्सिटीत इतिहास विषयाची प्रोफेसर राहिलेल्या डॉक्टर बहार जलाली यांच्याद्वारे ही चळवळ सुरू झाली आणि त्यांच्या या चळवळीला अफगाणिस्तानातील अनेक महिलांनी पाठिंबा दिला.