CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:40 PM2020-07-31T13:40:59+5:302020-07-31T13:56:38+5:30

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांतील संशोधन लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छता आणि सतत हात धुण्यास सांगितले जाते.

कोरोनाचा संसर्ग, त्याचे स्वरूप आणि रचना याबद्दल विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. अशात, पाण्यात कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होत असल्याचा दावा रशियन शास्त्रज्ञांनी केला आहे.

यासंदर्भातील स्टडी स्टेट रिसर्ट सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी वेक्टरद्वारे करण्यात आली आहे. या स्टडीमध्ये शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, ७२ तासांत पाणी जवळजवळ पूर्णपणे कोरोना नष्ट करू शकते.

स्टडीनुसार, व्हायरसचे स्वरूप थेट पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, कोरोना व्हायरसचे ९० टक्के कण २४ तासांत आणि ९९.९ टक्के कण खोलीच्या सामान्य तापमानावर पाण्यात मरतात.

स्टडीनुसार, असे म्हटले आहे की, उकळत्या पाण्याच्या तपमानावर कोरोना व्हायरस पूर्णपणे आणि त्वरित मरतो. काही परिस्थितींमध्ये व्हायरस पाण्यात राहू शकतो, परंतु तो समुद्रामध्ये किंवा ताज्या पाण्यात वाढत नाही.

कोरोना व्हायरस ४८ तासांपर्यंत स्टेनलेस स्टील, लिनोलियम, काच, प्लास्टिक आणि सिरेमिकच्या पृष्ठभागावर सक्रीय राहतो. संशोधनात असे आढळले आहे की, हा व्हायरस एकाच ठिकाणी चिकटत नाही आणि बहुतेक घरातील जंतुनाशक हे याला नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरत आहेत.

संशोधनात असे दिसून आले आहे की, ३० टक्के कॉन्सन्ट्रेशन एथिल आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल अर्ध्या मिनिटात व्हायरसचे दहा लाख कण नष्ट करू शकते.

हे मागील स्टडीच्या दाव्यांचे खंडन करते, ज्यात असे म्हटले होते की, व्हायरस नष्ट करण्यासाठी ६० टक्कांपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन असणारे अल्कोहोल आवश्यक आहे.

नवीन स्टडीसानुसार पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीन देखील खूप प्रभावी ठरले आहे. कोणत्याही क्लोरीनचे निर्जंतुकीकरण केल्यावर Sars-CoV-2 30 सेकंदात पूर्णपणे नष्ट होते.

दरम्यान, रशियानेही कोरोना व्हायरसची लस बनविल्याचा दावा केला आहे. तिथल्या माध्यमांच्या वृत्तानुसार, गेमालेया इंस्टीट्युटद्वारे विकसित केलेली लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.