कोरोना हरणार, देश जिंकणार! नव्या स्ट्रेनपासून 'असा' करा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:35 AM2021-02-13T09:35:37+5:302021-02-13T09:49:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबत संशोधन सुरू असून संशोधनातून महत्त्वाची माहिती ही सातत्याने समोर येत आहे. अशीच काहीशी दिलासादायक माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

अनेक देशांमध्ये कोरोनाबाबत संशोधन सुरू असून संशोधनातून महत्त्वाची माहिती ही सातत्याने समोर येत आहे. अशीच काहीशी दिलासादायक माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे.

कोरोना नव्या स्ट्रेनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची देखील चिंता वाढली आहेय याच दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून कसा बचाव करायचा हे समोर आलं आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेने आपल्या नागरिकांना दोन मास्क वापरण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनने (सीडीसी) आपल्या रिपोर्टमध्ये याबाबतचे निर्देश दिले आहेत.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) रिपोर्टनुसार, डिस्पोजेबल सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरल्यास व्हायरसपासून 95 टक्के अधिक सुरक्षिता मिळू शकणार आहे.

सर्जिकल मास्कच्यावर कपड्यांचा मास्क लावल्यास पहिल्या मास्कच्या बाजूने हवा आत जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मास्क पूर्णपणे फिट असल्याने हवा तोंड, नाकावाटे शरिरात जात नाही आणि त्यामुळे नव्या स्ट्रेनपासून बचाव होऊ शकतो असं नमूद करण्यात आलं आहे.

सीडीसीचे संचालक रोचेल वालेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटात यामुळे दिलासा मिळाला आहे.

सीडीसीचे वैद्यकीय अधिकारी जॉन टी ब्रुक्स यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क प्रभावी ठरत असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी दोन मास्क लावण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या महासाथीच्या आजारावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असं सांगितलं आहे.

सीडीसीने आपल्या रिसर्चमध्ये तीन स्तर असलेला सर्जिकल मास्क कफमधून निघणाऱ्या कणांना 42 टक्क्यांपर्यंत रोखतो. तर तीन स्तर असलेला कपड्यांचा मास्क 44 टक्के कणांना रोखतो. मात्र, जेव्हा सर्जिकल मास्कवर कपड्यांचा मास्क वापरला तर 92 टक्के कणांना रोखता येऊ शकतं.

लोकांनी मास्क योग्य प्रकारे लावण्याचे आवाहन सीडीसीने केलं आहे. आपल्या जवळपासच्या नागरिकांनी दोन मास्कचा वापर केला असेल तर संसर्गापासून 95 टक्क्यांपर्यंत सुरक्षा मिळू शकते असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दोन मास्क वापरण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय संसर्गजन्य विकार तज्ज्ञ अँथोनी फॉकी यांनी दोन मास्कचा वापर हा कॉमन सेन्सचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

दोन मास्क वापरण्याचा सल्ला देण्यामागे या मास्कमुळे फिल्ट्रेशन आधिक चांगलं होतं. विमान, रेल्वे अथवा सार्वजनिक जागी म्हणजेच ज्या ठिकाणी गर्दी असेल अशा ठिकाणी दोन मास्कचा वापर करता येऊ शकतो.

दोन मास्कचा वापर केल्यामुळे व्हायरसपासून 50 ते 75 टक्के अधिक बचाव होऊ शकतो असं एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या संशोधनात सर्जिकल प्रकारच्या मास्कच्या पार्टीकल्स हटवण्याच्या क्षमतेवर अभ्यास करण्यात आला होता.

सुरुवातीच्या काळात एन95 मास्कची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कापडापासून तयार केलेला मास्क वापरावा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे नागरिक कापडाच्या मास्कचा वापर करण्याऐवजी एन95 मास्क वापरण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत.

फ्रान्समध्ये (France) कापडापासून बनवलेला मास्क कमी प्रमाणात वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीडीसीच्या वेबसाईटनुसार, जास्त लेअर्स असलेला कापडी मास्क हा देखील सर्जिकल मास्कप्रमाणेच सुरक्षित ठरू शकतो. दोन मास्क चेहऱ्यावर लावणे अधिक सुरक्षित ठरू शकते असं संशोधक म्हणतात.