Coronavirus: गोऱ्या लोकांपेक्षा काळ्या लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक? स्टडी रिपोर्टमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 12:10 PM2020-06-07T12:10:27+5:302020-06-07T12:14:05+5:30

जगात जितके रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांची आरोग्य स्थिती आणि मृत्यूचं कारण याबाबत आरोग्य अहवालाच्या आधारे एक अभ्यास रिपोर्ट समोर आला आहे. यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये डार्क स्किन(काळे लोक) असणाऱ्या लोकांचा मृत्यू वाइट स्किन(गोरे लोक) यांच्यापेक्षा दुप्पट आहे असं समोर आलं आहे.

हा रिपोर्ट पब्लिक हेल्थ इंग्लंडद्वारा जारी करण्यात आला आहे. जवळपास ८४ पानांच्या या अहवालात डार्क स्किन कलर आणि एशियन नेटिव्ह लोकांची संख्या कोरोना संक्रमणात अधिक आहे असं दिसतं. दर एक लाख रुग्णामागे कोरोनाचे जितके केस मिळाले ते डार्क स्किनच्या लोकांचे आहेत असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.

संपूर्ण जगात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचा रिपोर्ट काढला तर या स्किन कलर आणि नेटिव्ह प्लेसच्या आधारे डार्क स्किनच्या रुग्णांची संख्या वाइन स्किनच्या रुग्णांपेक्षा दुप्पट आहे असं सांगण्यात आलं आहे.

या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, स्किन कलरवरुन कोरोना रुग्णांचा अभ्यास करणे या कुठेही वर्णभेद करण्याचा उद्दिष्ट नाही. पण विभागावर आणि रंगाच्या आधारे मानवी जीवनावर कोरोनाचा प्रभाव किती हे जाणून समजून घ्यायचं आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलांची तुलना रंगाच्या आधारावर केली तर वाइट स्किनच्या महिलांची संख्या काळा रंग आणि डार्क स्किन महिलांच्या तुलनेत तिप्पट आहे. दुसरीकडे, पांढऱ्या त्वचेच्या टोनच्या स्त्रियांची तुलना आशियाई देशातील स्त्रियांबरोबर किंवा मिश्रित त्वचा टोनच्या स्त्रियांशी केली गेली तर पांढऱ्या त्वचेच्या टोन असलेल्या स्त्रियांची संख्या या महिलांपेक्षा १.६ टक्के जास्त आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, त्वचा टोनच्या आधारे कोरोना विषाणूच्या परिणामाचा अभ्यास करण्याची कल्पना अशा वेळी आली जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मरण पावलेल्या सरकारी मंत्रालयातील कर्मचार्‍यांची संख्या काळ्या रंगाच्या रुग्णांची जास्त होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कोविड -१९ संक्रमणामुळे बीएएमई (ब्लॅक एशियन मायनॉरिटी एथनिक) समुदायातील ९९ आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यात २९ डॉक्टर ब्रिटीश मूळचे होते. या २९ डॉक्टरांपैकी २७ डॉक्टर म्हणजे एथानिक माइनॉरिटी बॅकग्राऊंडमधून येतात.

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) च्या ताज्या आकडेवारीनुसार कोविडमुळे मरणाऱ्या रुग्णांपैकी डार्क स्किन लोकांची एकूण संख्या पांढऱ्या त्वचेच्या तुलनेत ४ पट जास्त आहे. अशा परिस्थितीत यामागचे कारण काय आहे हे मनात येणे स्वाभाविक आहे?

कारण केवळ यूकेमध्येच नाही तर अमेरिकेतही, डार्क त्वचेची टोन असणार्‍या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे आणि मृत्यूदरही त्यांचा जास्त आहे.

परंतु आशियाई आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांमध्ये कोरोना संसर्ग का अधिक प्राणघातक ठरु लागला आहे याचा अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. कारण पांढऱ्या त्वचेच्या टोनच्या लोकांपेक्षा यांच्यात कोरोना अधिक वेगाने पसरला आहे आणि या रुग्णांचा मृत्यूही होत आहे.