अमेरिकेत कडाक्याची थंडी, बर्फवृष्टीमुळे लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:10 PM2019-01-30T15:10:26+5:302019-01-30T15:26:46+5:30

अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या तापमानात कमालीची घट नोंदवली गेली आहे.

अशा प्रकारची बर्फवृष्टी अनेक वर्षांनी होत आहे. तर तापमान फारच खाली घसरलं आहे.

या थंडीमुळे जवळपास साडेपाच कोटी लोक प्रभावित होणार आहेत.

विस्कोन्सिन, मिशिगन, एलिनोइससारख्या मध्य पश्चिमी राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

या वातावरणातील बदलाचा परिणाम अलाबामा आणि मिसिसिपीमध्ये होणार आहे.

या कडाक्याच्या थंडीत 10 मिनिटांपर्यंत बाहेर राहणं तब्येतीसाठी घातक ठरू शकते.

या कडाक्याच्या थंडीत सर्दीनं अंग सुन्न पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शिकागोचं तापमानही अंटार्क्टिकाहून अधिक होतं.