युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:58 IST2025-06-23T15:53:31+5:302025-06-23T15:58:22+5:30

जगात सध्या युद्धाचे वातावरण असताना चीन सातत्याने त्यांना सशक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यातच चीनने एक पाऊल पुढे टाकले आहे. चिनी वैज्ञानिकांनी एक मिलिट्री ड्रोन तयार केले आहे. या ड्रोनची साईज आणि आकार एका मच्छरासारखा आहे. मच्छरच्या आकाराचे हे ड्रोन युद्धाच्या मैदानात विध्वंस करण्यासाठी सज्ज आहेत.
विशेष म्हणजे या खास ड्रोनचा वापर करून ना केवळ सर्विलांस करता येऊ शकते तर त्याचा वापर करून एखादे मिशन यशस्वीही करता येऊ शकते. चीनकडून तयार करण्यात आलेले हे अत्याधुनिक शस्त्र मच्छर ड्रोनबाबत जाणून घेऊया...
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चिनी वैज्ञानिकांनी त्यांच्या मिलिट्री ऑपरेशनसाठी मच्छरच्या आकाराचे एक खूप लहान ड्रोन तयार केले आहे. हे माइको ड्रोन नॅशनल युनिवर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नोलॉजीच्या रोबोटिक्स प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहे. जे मध्य चीनच्या हुनान प्रांतात आहे.
हे माइको ड्रोन आकाराने छोटे आणि कॉम्पॅक्ट आहेत. त्याचा वापर मिलिट्री आणि डिफेन्सशिवाय विविध Apps च्या माध्यमातून केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, हा प्रोटोटाइप संशोधकांकडून सीसीटीव्ही ७ डिस्प्लेवर तयार केला आहे. मच्छराच्या आकाराच्या या ड्रोनमध्ये २ छोटे पंख आहेत, ज्याने ते हवेत उडू शकते.
सोबतच या ड्रोनला मच्छरांसारखे ३ पायदेखील आहेत. हा ड्रोन स्मार्टफोनने कंट्रोल केला जाऊ शकतो. हे जवळपास एक मच्छर म्हणजे १.३ सेंटीमीटर लांब आहे. त्यामुळेच याला Mosquito Drone असं म्हटले जाते.
NUDT चा एक विद्यार्थी लियांग हेक्सियांगने म्हटलं की, माझ्या हातात मच्छरासारखा एक खास रोबोट ड्रोन आहे. याप्रकारचे छोटे बायोनिक रोबोट खासकरून गुप्त माहिती आणि युद्धाच्या मैदानात उपयोगी ठरणार आहे.
चीनने विकसित केलेले हे छोटे ड्रोन अतिमहत्त्वाच्या मिशनसाठी खूप उपयोगी पडणार आहेत, कारण त्याच्याबाबत कुणालाही काही माहिती मिळणार नाही आणि सहजपणे हे ड्रोन देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात.
आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठीही या मच्छर ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. एखाद्या मलब्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेतानाही या ड्रोनचा विशेष फायदा होणार आहे.
त्याशिवाय हवेची गुणवत्ता किंवा पाण्याची गुणवत्ता यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर्ससह माइक्रो ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.