CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याचे आश्वासन; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:25 PM2020-05-19T18:25:03+5:302020-05-19T18:51:23+5:30

CoronaVirus व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा जिनपिंगसह अन्य देश WHO च्या सम्मेलनामध्ये सहभागी झाले होते.

कोरोना व्हायरसमुळे अवघ्या जगाला त्रास देणाऱ्या चीनने आता जगाची किती काळजी असल्याचे भासविण्यास सुरुवात केली आहे. एएफपीनुसार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जग विरोधात जात असल्याचे पाहून चीन तयार करत असलेली लस साऱ्या जगाला पुरविणार असल्याची घोषणा केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सम्मेलनाला जिनपिंग संबोधित करत होते. त्यांनी सांगितले की कोरोना व्हायरच्या लढाईसाठी चीन २ बिलियन डॉलर म्हणजेच १५१३९ कोटी रुपये मदत देणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये विकसनशिल देशांसाठी कोरोना विरोधातील लढाईला ही मदत देण्यात येणार असल्याचे जिनपिंग यांनी सांगितले.

चीनने हा दावा केला आहे की, कोरोना संकटाबाबत ते नेहमी पारदर्शी राहिले आहेत. शी जिनपिंग यांनी सांगितले की, जर चीन यावर लस बनविण्यास यशस्वी ठरला तर ही लस जगासाठी उपलब्ध केली जाणार आहे.

चीनवर अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील देशांनी कोरोनाची माहिती लपविल्याचे आरोप केले होते. तसेच चीनमध्ये एक लॅब होती, त्यामधून हा व्हायरस लीक झाल्याचेही आरोप केले गेले. यावर चीननेही आम्ही सुरुवातीचे व्हायरचे सँपल नष्ट केल्याचे कबूल केले आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा जिनपिंगसह अन्य देश WHO च्या सम्मेलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जिनपिंग यांनी सांगितले की, जेव्हा कोरोना संकट संपेल तेव्हा कोरोनाविरोधात जगाच्या वागण्याचे मुल्यांकन केले जावे.

युरोपियन युनियनसह २७ सदस्य देशांनी WHO च्या कोरोनाबाबतीतल्या वागण्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर सहमत असल्याचे जिनपिंग म्हणाले.

अमेरिकेच्या गुप्हहेर संस्थेने मोठा गौप्यस्फोट केला होता. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी WHO च्या प्रमुखांना कोरोनासंबंधित सूचना जगाला देण्यामध्ये उशिर करण्याची मागमी केली होती. मात्र, WHO ने याचे खंडन केले होते.

अमेरिकेने WHO ला निधी रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने तीन लाख डॉलरचा अतिरिक्त निधी देण्याची घोषणा केली होती. याआधी चीनने WHO ला दोन लाख डॉलर दिले होते.

कोरोना व्हायरस नक्की कसा व केव्हा पसरला, याबाबत अजून चर्चा सुरूच आहेत. नोव्हेंबर महिन्यात हा व्हायरस पसरल्याचे चीननं कबुल केलं होतं. पण, फ्रान्सची खेळाडू एलोडीए क्लोऊव्हेलनं ऑक्टोबर महिन्यातच चीनमध्ये हा व्हायरस पसरल्याचा धक्कादायक खुलासा केला.

चीनमधील एका लष्करी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील कोरोनाबाधित आणि बळींचा आकडा सांगितल्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. चांगशा सिटीतील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मते चीनमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८४ हजार नसून ६ लाख ४० हजार इतका आहे. चीनकडून सांगितल्या जात असलेल्या संख्येबाबत जागतिक समुदायाकडून आधीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. याला तेथील सत्ताधाऱ्यांचे लपवाछपवीचे धोरण कारणीभूत आहे.

Read in English