चीनची कुरापत; भारताशेजारी बनवत आहे कृत्रिम बेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 08:55 PM2020-05-12T20:55:33+5:302020-05-12T21:18:35+5:30

चीनच्या कुरापती सुरूच आहेत. पहिल्यांदा चीनमुळे जगभरात कोरोना व्हायरस पसरला. चीनमधील कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता संपूर्ण जगाला कोरोनाचा त्रास सहन करावा लागत आहे. चीनच्या शेजारी असलेले भारत, दक्षिण कोरिया, जपान, इंडोनेशिया, थायलँड हे देश सर्वात समस्याग्रस्त आहेत. आता तर चीनकडून भारतापासून थोड्या अंतरावर समुद्रात एक बेट तयार करण्यात येत आहे.

चीन आता भारतापासून 684 कि.मी. अंतरावर मालदीवजवळ कृत्रिम बेट तयार करत आहे. यामुळे भारतासह अनेक देशांना राजनैतिकदृष्ट्या धोका निर्माण होईल. चीन कृत्रिम बेट तयार करत असल्याचे सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. हे फोटो ओपन सोर्स इंटेलिजन्स अॅनालिस्ट डेट्रेस्फाने जारी केले आहेत.

जगभरातील शस्त्रे खरेदी-विक्रीवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी सीआयपीआरआयचे संचालक हॅनेस क्रिस्टन्सन यांनी ट्विट करत सांगितले की मालदीवच्या फडुफिनोल्हू बेटाला मालदीव सरकारने चीनला ४ मिलियन डॉलर म्हणजेच ३०.३३ कोटी रुपयांना रुपये भाडेतत्त्वावर दिले होते.

हॅनेस क्रिस्टन्सन लिहिले आहे की, आता चीनने हे बेट आणखी वाढविले आहे. यावर रस्ते, इमारती वगैरे बांधलेली दिसतात. चीन भारताला वेढा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनने हिंद महासागराला कर्ज देऊन अनेक देशांना आपल्या जाळ्यात अडकविले आहे.

आपल्या माहितीसाठी, मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी २०१६ मध्ये चीनी कंपन्यांना 16 बेटे भाड्याने दिली होती. चीन यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते, चीन या माध्यमातून राजनैतिकदृष्ट्या भारताला वेढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

चीन मालदीवच्या माध्यमातून भारतावर नजर ठेवून आहे. चीनचे लढाऊ विमान मालदीवहून भारतात पोहोचण्यासाठी फक्त 20-25 मिनिटे लागतील.

हिंद महासागरात मालदीव अशा ठिकाणी आहे. ज्या ठिकाणाहून बरेच आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग जातात. त्यामुळे याचा फायदा पाहून चीन मालदीवला मदत करुन आपला मार्ग तयार करीत आहे.

अब्दुल्ला यामीन यांच्या कार्यकाळात भारत आणि मालदीव दरम्यान तणाव वाढला होता. तेथील परिस्थिती अशी बनली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव दौरा रद्द केला होता.