Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या उत्पत्तीचं सत्य जगासमोर येऊ नये म्हणून चीनची लबाडी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:25 PM2021-06-24T19:25:44+5:302021-06-24T19:29:18+5:30

Coronavirus: कोरोनाच्या महामारीनं गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर मोठं संकट उभं केले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. हा व्हायरस नेमका कुठून आणि कसा आला याचा शोधही सुरू आहे.

कोरोना व्हायरसचं मूळ शोधण्यावरून चीन आणि त्यांची वुहान लॅबबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसचा स्त्रोत उघड होण्याच्या भीतीनं अत्यंत महत्त्वाचा सुरुवातीच्या रुग्णांचा डेटा डिलीट केला आहे.

कोरोना कुठून जन्माला आला याचा गांभीर्याने शोध सुरू आहे. या तपासात या महामारीचं केंद्रबिंदू असलेल्या वुहान येथून अनेक रुग्णांची नमुना चाचणी आंतराष्ट्रीय डेटाबेसवरून डिलीट करण्यात आली आहे. हा आंतरराष्ट्रीय डेटाबेस कोरोना व्हायरसच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता.

या अहवालातून कोरोना वायरसच्या उत्पत्तीबाबत महत्त्वाचा पुरावा हाती लागण्याची शक्यता होती. डिसेंबर २०१९ मध्ये वुहानच्या सी फूड मार्केटमधून प्रसार होण्यापूर्वी कधीपासून ही महामारी चीनमध्ये पसरली आहे याचाही शोध लागला असता.

ही आकडेवारी डिलीट करणाऱ्याला पकडणारे अमेरिकन प्रोफेसरने काही डेटा पुन्हा रिकव्हर केला आहे. अमेरिकन प्रोफेसर जेसे ब्लूमने सांगितले की, चीनने जेव्हा कोरोचा प्रार्दुभावाची माहिती दिली आहे त्याच्या फारआधीपासून ही महामारी चीनमध्ये पसरली होती.

व्हायरसच्या सुरुवातीच्या नमुन्यातून हा व्हायरस किती विकसित झाला याची माहिती मिळाली असती. हा व्हायरस लॅबमधून लीक झाला यावर त्यांनी भाष्य केले नाही. चीनने हा डेटा यासाठी डिलीट केला असावा जेणेकरून कोरोनाचं अस्तित्व जगापासून लपवून ठेवता येईल असं प्रोफेसर म्हणाले.

ब्रिटीश वैज्ञानिकांचे म्हणणं आहे की, या तपासातून कोरोना व्हायरस वुहानच्या मार्केटमधून न पसरता त्यापूर्वीच चीनमध्ये पसरला होता असा शोध लागणार होता. डेटा डिलीट करण्याची वेळ पाहता असा संशय येऊ लागला आहे की, चीनच्या वुहान लॅबमधून चुकीनं हा कोरोना व्हायरस लीक झाला.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरससाठी चीनच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. आजही अमेरिका कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावासाठी चीनलाच दोषी ठरवत आहे. त्यामुळे नेमका हा व्हायरस कुठून उत्पन्न झाला याचा शोध जगभरातील संशोधक आणि तज्त्र करत आहेत.

दरम्यान, वुहान प्रयोगशाळेतून वटवाघळांवर सुरू असलेल्या संशोधनातूनच कोरोना विषाणू लीक झाल्याचा आरोप जगभरातून केला जात असतानाच चीननं कोरोना काळात उत्तम कार्यासाठी वुहान प्रयोगशाळेचा गौरव केला आहे. कोरोना विषाणू वुहान प्रयोगशाळेतून लीक होऊन जवळच असलेल्या वुहान वेट मार्केटमध्ये पोहोचला आणि तिथूनच त्याचा प्रसार वाढल्याचं सांगण्यात येत आहे.

याच ठिकाणी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. इतकंच नव्हे, तर चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील पिंजऱ्यांमध्ये विविध प्रजातिच्या वटवाघळांना ठेवण्यात येतं आणि त्यांच्यावर प्रयोग केले जातात. वुहान प्रयोगशाळेतील काही फोटो लीक झाले होते त्यातून ही माहिती समोर आली होती

इतकचं नाही तर ज्या वुहानच्या लॅबवर जगातून आरोप होतोय, चीननं मात्र याच प्रयोगशाळेनं कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेलं काम सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हणत चायना अकॅडमी ऑफ सायन्सकडून विज्ञान व तंत्रज्ञान निर्मितीसाठी वुहान प्रयोगशाळेला पुरस्कार दिला आहे.

Read in English