चीन विनाशाच्या उंबरठ्यावर? त्या कारणामुळे लाखो लोकांवर मृत्यूची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 03:42 PM2021-06-15T15:42:12+5:302021-06-15T15:46:30+5:30

China News: कोरोना विषाणूचा फैलाव हा चीनमधूनच जगातील इतर भागात झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र आता चीन त्यानेच रसलेल्या एका कारस्थानाची शिकार होण्याच्या मार्गावर आहे. चीनमधील तायशन शहरावर विनाशाचे सावट घोंघावत आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव हा चीनमधूनच जगातील इतर भागात झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र आता चीन त्यानेच रसलेल्या एका कारस्थानाची शिकार होण्याच्या मार्गावर आहे. चीनमधील तायशन शहरावर विनाशाचे सावट घोंघावत आहे. येथील एका अणुकेंद्रातून धोकादायक रेडिएशन होऊ लागले आहे. त्यामुळे येथे कधीही कुठल्याही क्षणी विस्फोट होण्याची शक्यता आहे.

चीनच्या गुआंगदोंग प्रांतामध्ये असलेल्या एका अणुकेंद्रामधून विध्वंसाचा हा धोका निर्माण झालेला आहे. या अणुकेंद्रामध्ये किरणोत्सर्ग झाल्याचे वृत्त आल्यानंतर चीनने लपवाछपवीचा खूप प्रयत्न केला. मात्र अमेरिकेने झटपट कारवाई करत चीनची ही भयानक बेफिकिरी जगासमोर आणली आहे.

ज्या अणुकेंद्रातून रेडिएशन लीक झाले आहे ते केंद्र चीनच्या गुआंगदोंग प्रांतातील तायशन शहरामध्ये आहे. या प्लँटमधून रेडिएशन होत असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. चीनमधील तायशन शहराची लोकसंख्या ही सुमारे १० लाख एवढी आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्याच चीनचे हे अणुकेंद्र संपूर्ण शहराला नष्ट करू शकते.

तायशन शहरातील हे अणुकेंद्र वाचवण्यासाठी जिनपिंग यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. चीनमधील हे अणुकेंद्र उभारण्यामध्ये फ्रान्सनेही मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे आता फ्रान्सही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अशा परिस्थितीत जेव्ही चीनमधील अणुकेंद्र लीक झाल्याची बातमी अमेरिकेत पोहोचली तेव्हा व्हाईट हाऊसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घाई गडबडीत अमेरिकेमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. आता चिनी अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्रान्स आणि अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आहे. त्यासाठी फ्रान्समधील कंपनीने चीनच्या अणुकेंद्रात झालेल्या रेडिएशन लीक संदर्भात यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीलाही पत्र पाठवले आहे.

बायडन सरकार गेल्या एका आठवड्यापासून या अहवालाचा अभ्यास करण्यात गुंतले आहे. चिनी न्यूक्लिअर पॉवर प्लँट मध्ये फ्रान्सच्याही एका कंपनीची भागीदारी होती. तसेच या कंपनीने लिकेजमुळे होणाऱ्या संभ्याव्य रेडिओलॉजिकल धोक्याबाबत इशारा दिला होता. मात्र आता अणुकेंद्रामधील परिस्थिती नियंत्रणात आहे.

सध्याच्या परिस्थितीत प्लँटमध्ये काम करणाऱ्या आणि चिनी नागरिकांना रेडिएशनचा किती मोठा धोका आहे याबाबतची माहिती समोर आळेली नाही. फ्रान्समधील एक कंपनीसोबत चीनने २००९ मध्ये तायशन अणुकेंद्राची निर्मिती सुरू केली होती.

२०१८-१९ पासून येथून विजेचे उत्पादन सुरू झाले होते. मात्र येथील परिस्थिती तेवढी धोकादायक नाही आहे. मात्र प्रकरण चिंताजनक असलेल्या परिस्थिती समीक्षा करण्यासाठी अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल या प्रकरणी सातत्याने बैठका घेत आहे.

चीन वीजनिर्मितीसाठी संपूर्ण देशात पॉवर प्लँट तयार करत आहे. असे प्लँट तयार करण्यासाठी चीन फ्रान्ससह जगातील अनेक मोठ्या देशांतील कंपन्यांची मदत घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून फ्रान्समधील Framatome या कंपनीची मदत घेतली जात आहे. चीनच्या न्यूक्लिएर एनर्जी असोसिएशच्या माहितीनुसार सध्या चीनमध्ये १६ न्यूक्लिअर प्लँट अॅक्टिव्ह आहेत. त्यामधून ५१ हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होते.