आम्हाला स्वातंत्र्य द्या, पाकला धडा शिकवा; बलुचिस्तानमधील लोकांनी मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:56 PM2019-08-15T14:56:11+5:302019-08-15T14:59:31+5:30

भारत एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे तर दुसरीकडे काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तानकडून काळा दिवस साजरा केला जातोय. जगाला धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या बलुचिस्तानने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जय हिंदचे नारे देत बलुचिस्तानच्या लोकांनी भारताला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.

भारत सरकारने बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून द्यावं अशी मागणी होऊ लागली आहे. भारत-पाक यांच्यात तणाव असताना बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधात आंदोलन होऊ लागलं आहे.

1948 मध्ये पाकिस्तानने संघर्ष करुन बलुचिस्तानवर कब्जा मिळविला होता. 11 ऑगस्ट 1947 रोजी बलुचिस्तानला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. मात्र पाकिस्तान बलुचिस्तानवर आपला हक्क सांगते.

पाकिस्तानच्या 44 टक्के भाग बलुचिस्तानचा आहे. हा परिसर सर्वाधिक गरीब आणि उपेक्षित आहे.