भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:57 AM2020-05-21T11:57:17+5:302020-05-21T12:18:33+5:30

1962 मध्ये येथूनच चीनने केला होता हल्ला - पॅंगोंग सरोवर 1962 पासूनच दोन्ही देशातील तणावामुळे चर्चेत राहतं. 1962 मध्ये चीनने या भागातून भारतावर मुख्य हल्ला केला होता.

भारत-चीन यांच्यात पडलेल्या ठिणगीमुळे पॅंगोंग सो पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. चीनने ससोवरात शस्त्रास्त्र असलेल्या बोटींची पेट्रोलिंग वाढवली आहे. तर भारतानेही उत्तर म्हणून क्विक रिस्पॉन्स टीम अतिरिक्त बोटींसह तैनात केल्या आहेत.

तिबेटमध्ये सो चा अर्थ सरोवर असा होतो. पॅंगोंग सो लडाखमध्ये 14 हजार फूटाच्या उंचीवर स्थित एक लांब, निमूळतं आणि खोल सरोवर आहे. याच्या चारही बाजूने जमीन आहे. हा सरोवर रणनीतिच्या रूपाने महत्वपूर्ण मानला जातो. दोन्ही देश सतत या सरोवराची पेट्रोलिंग करत असतात.

1962 मध्ये येथूनच चीनने केला होता हल्ला - पॅंगोंग सरोवर 1962 पासूनच दोन्ही देशातील तणावामुळे चर्चेत राहतं. 1962 मध्ये चीनने या भागातून भारतावर मुख्य हल्ला केला होता.

2017 मध्ये पॅंगॉंग सो मध्ये झाली होती भारत-चीन सैनिकांची झडप - ऑगस्ट 2017 मध्ये पॅंगॉंग सो च्या किनाऱ्यावर भारत आणि चीनचे सैनिक आपसात भिडले होते.

दोन्हीकडून जोरदार लाथा-बुक्क्या चालवल्या होत्या. दगडफेक, लाठी हल्ला आणि स्टील रॉडने एकमेकांवर हल्ले केले होते. 19 ऑगस्ट 2017 ला याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

पॅंगॉंग सरोवराचं महत्व - सरोवराच्या भौगोलिक स्थितीमुळे याचं रणनीतिक महत्व वाढतं. हा सरोवर चुशुल अप्रोचच्या रस्त्यावर येतो.

एक्सपर्ट्सनुसार, चीनने जर भविष्यात कधी भारतीय क्षेत्रात हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर चुशुल अप्रोचचा वापर करेल कारण यालाही महत्व आहे. पॅंगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेला चीन हालचाली करू शकतो याची शक्यता नेहमीच असते.

लेहपासून 54 किलोमीटर दूर आहे पॅंगोंग - पॅंगोंग सरोवर हे लेहच्या दक्षिणपूर्वेत 54 किलोमीटर अंतरावर आहे. 134 किलोमीटर लांब हा सरोवर 604 वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. ज्या पॉइंटवर याची रूंदी सर्वात जास्त आहेत त्याचं अंतर 6 किमोमीटर आहे. (Image Credit : vargiskhan.com)

सरोवरच्या दोन तृतीयांश भागावर चीनचं नियंत्रण - पॅंगोंग सरोवर तिबेटपासून ते भारतीय क्षेत्रात पसरला आहे. याचा पूर्व भाग तिबेटमध्ये आहे. याचा 89 किलोमीटर म्हणजे साधारण दोन तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणात आहे. सरोवराच्या 45 किलोमीटर पश्चिम भागावर म्हणजे एक तृतीयांश भागावर भारताचं नियंत्रण आहे.

चीनने तयार केला रस्ता - चीनने पॅंगोंग सरोवराच्या आजूबाजूला मजबूत सैन्य इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे. सरोवराच्या किनाऱ्याला लागून असा रस्ता तयार केलाय ज्यावरून जड आणि सैन्य वाहनं जाऊ शकतात.

पॅंगोंग सरोवर 14,270 फूट म्हणजे 4,350 मीटर उंचीवर स्थित आहे. हिवाळ्यात इथे तापमान शून्याच्या खूप खाली असतं. त्यामुळे हा सरोवर गोठतो.