खतरनाक! अमेरिकेने फोडला १८ हजार किलो वजनाचा बॉम्ब तर समुद्रात आला भूकंप, बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:52 PM2021-06-22T14:52:36+5:302021-06-22T15:01:31+5:30

अमेरिकन नौदलाने या एअरक्राफ्ट कॅरिअरजवळ ४० हजार पाउंड म्हणजे १८, १४४ किलोचा स्फोट केला होता. या स्फोटासोबतच समुद्राच्या एका मोठ्या भागात मोठी हालचाल जाणवली.

चीन, रशिया आणि इराणसारखे देशांसोबत अमेरिकेचं नातं तसं फार चांगलं नाही. अशात अमेरिका सतत आपली सैन्य ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतीच अमेरिकेच्या नौदलाने आपल्या नव्या एअरक्राफ्ट कॅरिअरची टेस्टिंग करण्यासाठी स्फोट घडवून आणला. ज्यामुळे समुद्रात भूकंपसारखी स्थिती निर्माण झाली होती.

अमेरिकन नौदलाने ही टेस्टिंग करण्यासाठी विमानवाहक जहाजाजवळ ४० हजार पाउंडच्या विस्फोटकांचा स्फोट केला. अनेकदा युद्धाच्या स्थितीत बॉम्ब या विमानवाहक जहाजांजवळ पडतात. अमेरिकन नौदलाला हे बघायचं होतं की, युद्धाच्या स्थितीत हे जहाज स्फोटाचा झटका पेलू शकतं की नाही.

अमेरिकन नौदलाने या एअरक्राफ्ट कॅरिअरजवळ ४० हजार पाउंड म्हणजे १८, १४४ किलोचा स्फोट केला होता. या स्फोटासोबतच समुद्राच्या एका मोठ्या भागात मोठी हालचाल जाणवली. आणि स्फोटामुळे पाणी अनेक फूट उंच उडालं होतं.

हा स्फोट इतका खतरनाक होता की यामुळे ३.९ तीव्रतेचा भूकंप रेकॉर्ड करण्यात आला. अमेरिकन नौदलाने याबाबत सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, या स्फोटाचा उद्देश नव्या जहाजांचं परीक्षण करणं हा होता.

यूएसस जेराल्ड आर फोर्ड नावाच्या या अॅडव्हान्स कॅरिअरमध्ये फ्लोरिडाच्या तटावर जवळपास १०० मैल दूर अटलांटिक महसागरात हा स्फोट करण्यात आला.