जगात या महिलेचा चेहरा आहे सर्वात सुंदर, आमचा नाही हा तर सायन्सचा दावा; बघा आहे तरी कोण ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:41 PM2022-06-21T15:41:19+5:302022-06-21T15:57:15+5:30

State-of-the-art face-mapping data नुसार, सुंदरतेच्या बाबतीत एम्बरने किम कार्दशियान आणि ब्रिटीश मॉडल केट मॉसलाही मागे टाकलं आहे.

जगात सर्वात सुंदर चेहरा कुणाचा आहे? सायन्सने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अमेरिकन अभिनेत्री एम्बर हर्ड ही जगातली सर्वात सुंदर महिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

State-of-the-art face-mapping data नुसार, सुंदरतेच्या बाबतीत एम्बरने किम कार्दशियान आणि ब्रिटीश मॉडल केट मॉसलाही मागे टाकलं आहे.

चेहऱ्याची सुंदरता मोजण्यासाठी Beauty Phi च्या ग्रीक गोल्डन रेश्योचा वापर करण्यात आला होता. हजारो वर्षांपासून याला परफेक्ट चेहरा मोजण्याचा सीक्रेट फॉर्मूला म्हटलं जातं. या फॉर्मूल्याच्या माध्यमातून हे समजलं की, 36 वर्षीय एम्बरचा चेहरा 91.85 टक्के एक्यूरेट आहे.

एम्बरची टेस्ट लंडनचे सर्जन डॉ. ज्यूलियन डी सिल्वा यांनी केली होती. त्यांनी सांगितलं की, ही टेस्ट लेटेस्ट फेशिअल मॅपिंगच्या माध्यमातून करण्यात आली होती. फोटोत तिचे डोळे, आयब्रो, नाक, ओठ, हनुवटी, जबडा आणि फेशिअल शेप मोजला गेला. चेहऱ्याच्या 12 मार्कर पॉइंटला एनलाइज करण्यात आलं. एम्बरचा चेहरा Greek ration of Phi मध्ये 91.85 टक्के एक्यूरेट आहे.

ग्रीक्सचं माननं आहे की, सर्वच नॅच्युरल गोष्टींमध्ये रेश्यो असतो. ते मानतात की, जगातील सर्वात सुंदर चेहऱ्याचा सीक्रेट फॉर्मूलाही यात आहे.

लंडनमध्ये Centre For Advanced Facial Cosmetic & Plastic Surgery चालवणारे डॉ. ज्यूलियन डी सिल्वा म्हणाले की, आम्ही लोक एका नव्या कॉम्प्युटर मॅपिंग टेक्निकचा वापर करतो. या टेक्नीकच्या माध्यमातून सुंदर चेहऱ्यामागचे काही रहस्य शोधून काढतो.

या टेक्नीकच्या माध्यमातून किम कार्दशियानचा चेहराही टेस्ट करण्यात आला. ती सुंदरतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचा चेहरा 91.39 टक्के एक्यूरेट आहे.

तेच ब्रिटीश मॉडल केट मॉस ही सुंदरतेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिचा चेहरा 91.06 टक्के एक्यूरेट आहे.