मोठा खुलासा! ४ वर्षांआधीच पृथ्वीवर पोहोचले होते एलिअन्स, हार्वर्डच्या मोठ्या वैज्ञानिकाचा दावा....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 12:59 PM2021-02-08T12:59:19+5:302021-02-08T13:11:00+5:30

लोएब म्हणाले की, ही ऑक्टोबर २०१७ ची घटना आहे. एका फार वेगाने उडत असलेल्या वस्तूची माहिती मिळाली होती. या वस्तूचा स्पीड फार जास्त होता. पण तेव्हा.....

जगप्रसिद्ध हार्वर्ड यूनिव्हर्सिटीतील(Harvard university) एका प्रमुख वैज्ञानिकांनी दावा केला आहे की एलिअन्स २०१७ मध्येच पृथ्वीच्या(Earth) दौऱ्यावर आले होते. पण वैज्ञानिकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं.

प्रोफेसर एवि लोएब(Avi Loeb) यांनी त्यांच्या एका नव्या पुस्तकात हा दावा केला आहे. लोएब यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यासोबतही काम केलं आहे.

प्रोफेसर एवि लोएब यांच्या ज्या पुस्तकात एलिअनबाबत(Aliens) हा दावा करण्यात आला आहे त्या पुस्तकाचं नाव Extraterrestrial : The First Sign of Intelligent Life Beyond Earth असं आहे.

५८ वर्षीय इस्त्रायली- अमेरिकन एस्ट्रोनॉमरने सांगितले की, ४ वर्षाआधी एक असामान्य आकाराची वस्तू दिसली होती. पण वैज्ञानिक समुदायांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. वैज्ञानिकांनी चुकीचा अर्थ काढला होता.

लोएब म्हणाले की, ही ऑक्टोबर २०१७ ची घटना आहे. एका फार वेगाने उडत असलेल्या वस्तूची माहिती मिळाली होती. या वस्तूचा स्पीड फार जास्त होता.

असं वाटलं की, ही वस्तू दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर पोहोचली. मात्र, अनेक वैज्ञानिक प्रोफेसर एवि लोएब यांच्या या दाव्याशी सहमत नाहीत.

ऐस्ट्रोफिजिसिस्ट एथन सीगन यांनी फोर्ब्समध्ये लिहिले की, लोएब प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. पण त्यांना त्यांच्या तर्कांवर सहकारी वैज्ञानिकांकडून सहमती मिळवू शकले नाहीत.

पण प्रोफेसर लोएब म्हणतात की, रूढीवादावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याची परंपरा राहिली आहे. आणि ते याचा विरोध करतात.

ते म्हणाले की, गॅलिलिओने जेव्हा पहिल्यांदा प्रस्ताव दिला होता की, ब्रम्हांडाचं केंद्र पृथ्वी नाही. तेव्हा त्यांनाही शिक्षा देण्यात आली होती.

तेच काही वर्षांपूर्वी इस्त्राइलच्या स्पेस सिक्युरिटी एजन्सीचे माजी प्रमुख हॅम इशद यांनीही दावा केला होता की, एलिअन आहेत. इतकेच नाही तर इस्त्राइल आणि अमेरिका अनेक वर्षांपासून एलिअनच्या संपर्कात आहे.

इशद यांनी असाही दावा केला होता की, एलिअन्सनीच त्यांना त्यांची माहिती सार्वजनिकपणे जाहीर न करण्याचा सल्ला दिला होता.