दोनदा मिस्टर बीनने मृत्यूला दिला चकमा, एकदा पायलट बेशुद्ध झाला तर एकदा कार क्रॅश झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:13 AM2020-07-29T10:13:25+5:302020-07-29T10:37:09+5:30

आपल्या अफलातून कॉमेडीने ते प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. आज त्यांच्याबाबतचे दोन किस्से सांगणार आहोत. जे वाचून तुम्हाला तुम्हाला धक्का बसेल.

लोकप्रिय हॉलिवूड अभिनेते मिस्टर बीन म्हणजेच रोवन ऐटकिन्सन यांचे फॅन्स जगभरात आहेत. त्यांना ओळखत नाही असा क्वचितच व्यक्ती सापडेल. म्हणजे जे लोक हॉलिवूड सिनेमे बघतात त्यांना तर ते माहीत आहेत. आपल्या अफलातून कॉमेडीने ते प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. आज त्यांच्याबाबतचे दोन किस्से सांगणार आहोत. जे वाचून तुम्हाला तुम्हाला धक्का बसेल.

मिस्टर बीन म्हणून लोकप्रिय असलेल्या रोवन ऐटकिन्सन हे आयुष्यात दोनदा मृत्यूच्या दाढेतून परत आलेत. म्हणजे एकदा त्यांच्या प्लेनचा पायलट बेशुद्ध झाला तर त्यांनीच प्लेन चालवलं. दुसरी दुर्घटना कारसोबत झाली होती. चला जाणून घेऊ ते कसे यातून वाचले...

प्लेनमध्ये झालेली घटना ही एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणेच होती. म्हणजे मिस्टर बीन हे २००१ साली आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत केनियाच्या ट्रिपवर जात होते. त्यांच्या अजिबात ध्यानीमनी नव्हतं की, पुढे काय होणार आहे. सगळे आनंदी होते.

प्लेनने उड्डाण घेतल्यावर सगळं काही ठिक होतं. पण जेव्हा एअरक्राफ्ट केनियाच्या वर होतं तेव्हाच अचानक त्यांचा पायलट बेशुद्ध झाला.

या चार्टर्ड एअरक्राफ्टमध्ये (Cessna 202) रोवन यांची पत्नी सनेत्रा आणि त्यांचा आणि मुलगी दोघेही सोबत होते. सगळेजण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जात होते.

अखेर जीव वाचवण्यासाठी डॉक्टर बीन यांना प्लेनचा कंट्रोल आपल्या हाती घ्यावा लागला. त्यांनी तोपर्यंत कंट्रोल हाती घेतला जोपर्यंत पायलट शुद्धीवर येत नाही.

त्यांच प्लेन मोंबासाच्या रेझॉर्टपासून ते नायरोबीच्या विल्सन एअरपोर्टपर्यत उडत होतं. यातून ते सुखरूप बचावले.

त्यानंतर त्यांचा पुन्हा एकदा मृत्यूशी सामना झाला होता. पण यावेळीही नशीबाने त्यांना साथ दिली. रोवन हे त्यांच्या फेव्हरेट स्पोर्ट् कारमध्ये होते.

4 ऑगस्ट २०११ ला त्यांची 240mph सुपरकार रस्त्यावरील एका झाडाला आणि लॅम्प पोस्टला जाऊन भिडली. ही कार क्रॅश झाल्यावर यात आगही लागली.

या अपघातात त्यांच्या खांद्याला जखम झाली होती. मिस्टर बीनची McLaren F1 कार फॉर्म्युला वन डिझायनर प्रोफेसर Gordon Murray ने डिझाइन केली होती.

रोवन ऐटिकन्सन यांना ड्रायव्हिंग आणि रेसिंग कार्सची फार आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक लक्झरी आणि वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या कार्स आहेत.