फ्रिडाने केलं spring pool फोटोशूट; swimsuit मध्ये फ्लॉन्ट केलं बेबीबंप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:30 PM2021-10-19T12:30:00+5:302021-10-19T12:30:00+5:30

Freida Pinto: फ्रिडा लोकप्रिय अभिनेत्री असून ती ‘तृष्णा’, ‘ब्लॅक गोल्ड’, ‘नाईट ऑफ कप्स’, ‘डेजर्ट डान्सर’, ‘लव सोनिया’, ‘मोगली’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवणाऱ्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे फ्रिडा पिंटो.

कमी कालावधीत हॉलिवूडमध्ये प्रसिद्धीस आलेल्या फ्रिडाचा आज जागतिक स्तरावर मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

अॅडव्हेंचर फोटोग्राफर कोरी ट्रॅनसोबत साखरपुडा झालेली फ्रिडा लवकरच आई होणार आहे. सोशल मी़डियावर पोस्ट करत फ्रिडाने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.

अलिकडेच फ्रिडाचं बेबीशॉवर पार पडलं असून त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बाळाच्या आगमनासाठी फ्रिडा आणि कोरी सज्ज झाले असून त्यांनी त्यांच्या घरात बाळाच्या सोयीनुसार काही बदलदेखील केले आहेत.

फ्रिडाचं बेबीशॉवर झाल्यानंतर तिने बेबीबंपसोबत एक खास फोटोशूट केलं आहे.

फ्रिडाने अंडरवॉटर फोटोशूट केलं असून तिच्या चेहऱ्यावर आई होण्याचं तेज झळाळत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

फ्रिडाने पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये Monokini हे फोटोशूट केलं आहे.

फ्रिडाने अॅडव्हेंचर फोटोग्राफर कोरी ट्रॅनसोबत साखरपुडा केला आहे.

फ्रिडा लोकप्रिय अभिनेत्री असून ती ‘तृष्णा’, ‘ब्लॅक गोल्ड’, ‘नाईट ऑफ कप्स’, ‘डेजर्ट डान्सर’, ‘लव सोनिया’, ‘मोगली’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.