Met Gala 2022 : ३६ कोटी रूपयांचा ड्रेस घालून Kim Kardashian ने २१ दिवसात कमी केलं वजन, जाणून घ्या कसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:00 PM2022-05-03T12:00:15+5:302022-05-03T12:11:17+5:30

Met Gala 20222 : यावेळी किमच्या (Kim Kardashian) ग्लॅमरपेक्षा तिच्या वेट लॉसची चर्चा रंगी आहे. चला जाणून घेऊ तीन आठवड्यात किमने आपलं वजन कसं कमी केलं.

फॅशनचा सर्वाच मोठा इव्हेंट मेट गाला २०२२(Met Gala 2022) मध्ये २ मे च्या सायंकाळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सेलेब्स एकापेक्षा एक भारी आउटफिटमध्ये दिसले. सोशलाइट किम कार्दाशियांने मेट गालामध्ये आपल्या बॉयफ्रेन्डसोबत एन्ट्री घेतली. पण यावेळी किमच्या ग्लॅमरपेक्षा तिच्या वेट लॉसची चर्चा रंगी आहे. चला जाणून घेऊ तीन आठवड्यात किमने आपलं वजन कसं कमी केलं.

किमने मेट गालामध्ये Marilyn Monroe चा आयकॉनिक लूक रिक्रिएट केला. तिने Marilyn ने त्याच गाउनमध्ये फिट होण्यासाठी खूप घाम गाळला. तिने केवळ तीन आठवड्यात तिचं १६ पाउंड वजन म्हणजे साधारण ७ किलो वजन कमी केलं.

किमचा हा गाउन Marilyn Monroe ची आठवण देतो. हा ड्रेस तिने १९ मे १९६२ ला मॅडिसन स्क्वायर गार्डनमध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडीच्या परफॉर्मन्ससाठी घातला होता. याच्या तीन महिन्यांनंतर Marilyn चं निधन झालं होतं. आता किमने Marilyn च्या त्या गाउनचा आयकॉनिक लूक सादर केला.

या टाइट स्क्वीज्ड साइज गाउनमध्ये किम परफेक्ट फिट दिसत आहे. किमने आपल्या गाउनसोबत व्हायट फर कोट कॅरी केला होता. ब्लॉन्ड हेअर कलरला स्लीक बन शेप हेअरस्टाइल केली. यासोबत किमने १८ के व्हाइट गोल्ड अॅन्ड डायमंड इअररिंग घातले होते.

किमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे गाउनचे फोटो आणि डिटेल्स शेअर केले आहेत. तिने लिहिलं की, मला मर्लिन मुन्रोचा हा आयकॉनिक ड्रेस घालून फारच अभिमान वाटत आहे. हा स्कीन टाइट गाउन ६ हजार क्रिस्टलपासून तयार केला आहे. काही रिपोर्ट्सनुसार या ड्रेसची किंमत ४.८ मिलियन डॉल म्हणजे ३६.८४ कोटी रूपये आहे.

किमने आपल्या वेट लॉसबाबत Vogue सोबत बोलताना सांगितलं की, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मला ही आयडिया आली. जर मी Balenciaga लूक करत नाही तर मग अमेरिकन थीम पूर्ण कशी करणार. म्हणून यापेक्षा चांगली अमेरिकन थीम आणखी काय असली असती. Marilyn Monroe ...